


✍🏻 सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466
उमरखेड (दि. १३ फेब्रुवारी) यवतमाळ जिल्ह्यातील निबंधक अधिकाऱ्यांची अवैध सावकारी करणाऱ्या घरावर धाड टाकली.
उमरखेड येथील घटना
अवैध सावकारी करणाऱ्या टिल्लू नावाच्या घरावर यवतमाळ जिल्हा निबंधक अधिकाऱ्याची धाड चौकशीतून मोठे कबाड हाती लागण्याची शक्यता तब्बल चार तासा नंतरही चौकशी सुरूच यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शहरात मागील कित्येक वर्षापासून अवैध सावकारकीचा व्यवसाय वाढला असल्याची चर्चा होती.
अशातच दि. १३ फेब्रुवारी २०२४ रोजी उमरखेड येथील टिल्लू नामक भाजीपाला व्यावसायिकाच्या घरावर यवतमाळ जिल्हा निबंधक पथकाकडून धाड टाकण्यात आली.
या धाडीमध्ये अवैध सावकारांच्या संदर्भातील कबाड चौकशी पथकाच्या हाती लागले असून अद्याप पर्यंत चौकशी सुरूच आहे.
चौकशी सुरू असलेल्या घरासमोर पोलीस बंदोबस्त तयार करण्यात आला होता उमरखेड शहरात अवैध सावकारी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक विजय चव्हाण, जमादार मोहन चाटे, जमादार संतोष चव्हाण, पीसी श्रुती साबळे हे उपस्थित होते.














