Home Breaking News सकल मराठा समाज तर्फे गंगाखेड बंदचे आवाहन.

सकल मराठा समाज तर्फे गंगाखेड बंदचे आवाहन.

189

 

गंगाखेड :-अनिल साळवे

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आरक्षण कायदा तात्काल मंजूर करावा या प्रमुख मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे बसले असल्यामुळे त्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी दि. 14 फेब्रुवारी रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने गंगाखेड बंदचे आवाहन करण्यात आले आहे.दि.10 फेब्रुवारी पासून मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा आमरण उपोषण करीत असल्यामुळे या उपोषणास पाठिंबा दर्शवण्यासाठी गंगाखेड बंदची हक्क सकल मराठा बांधवाकडून होत असल्याचे निवेदनावर म्हटले आहे.शासनाने दिलेले मराठा आरक्षण वर अंमलबजावणी होत नसल्यामुळे महाराष्ट्र शासन मराठा समाजाची दिशाभूल करत असल्याचा निषेधार्थ उद्याच्या बंदचे आवाहन करण्यात आले आहे.गंगाखेड तहसीलदार यांना सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले असून या निवेदनावर सकल मराठा बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here