Home महाराष्ट्र शास्त्री महाविद्यालयात अवयवदानावर ज्ञानप्रबोधन

शास्त्री महाविद्यालयात अवयवदानावर ज्ञानप्रबोधन

158

 

प्रतिनिधी – पी डी पाटील सर

शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, पळासदळ तालुका एरंडोल जिल्हा जळगाव या महाविद्यालयात दिनांक १२ फेब्रुवारी २०२४ रोजी फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन मुंबई, रोटरी क्लब ऑफ नाशिक मिडटाउन व सुखकर्ता फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित खान्देश अवयवदान जनप्रबोधन रथ यात्रेचे आगमन झाले या निमित्ताने अवयदान आणि देहदान याचे महत्व या विषयावर प्रबोधनात्मक कार्यक्रम झाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे उपप्राचार्य डॉ पराग कुलकर्णी यांनी फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन मुंबई या संस्थेच्या कार्याची माहिती देऊन कार्यक्रमाची रूपरेषा व उद्दिष्टे सांगितले. सदर कार्यक्रमात प्रमुख वक्ते श्री प्रशांत पागनीस आणि श्री सुधीर बागाईतकर यांनी विद्यार्थ्यांना अंगदान आणि देहदान याचे महत्व विशद केले कश्या प्रकारे एक व्यक्ती जिवंतपणी अथवा मृत्यूपश्चात आठ ते दहा व्यक्तींना अंग दान करून जीवनदान देऊ शकतो हे पटवून दिले. अवयवाच्या दुर्दम आजाराने ग्रस्त व्यक्तीला अंगदान हा एकच उपाय असतो आणि अवयव हे कोणताही प्रयोगशाळेत तयार होऊ शकत नसते म्हणूनच आपण सर्वांनी एक सामाजिक बांधिलकी ठेवून अंग दानाचा संकल्प केले पाहिजे असे मान्यवरांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व प्राचार्य डॉ. विजय शास्त्री यांनी व त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी अंगदान केलेले असल्याचे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना हे महादान करण्यासाठी प्रोत्साहित केले. कार्यक्रमाला संस्थेचे सचिव रूपा शास्त्री मॅडम यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक जावेद शेख यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. राहुल बोरसे, प्रा. सूमेश पाटील व इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. सदर कार्यक्रमाच्या वेळी देहदानाबद्दल काही प्रबोधन पर पुस्तकांची भेट सुद्धा महाविद्यालयाला देण्यात आली. जनसंपर्क अधिकारी श्री शेखर बुंदले यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विशेष प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here