


*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड)मोबा.9075686100*
म्हसवड : निसर्गाने आपल्याला पुरुषाप्रमाणेच हात, पाय,डोळे,मेंदू दिला आहे त्यांचा योग्य वापर करून महिलांनी सक्षम बनावे असे आवाहन अहिल्यादेवी उत्कर्ष मंडळाच्या अध्यक्षा डॉ.किरण कारंडे यांनी केले .समय फौंडेशनच्या वतीने दहिवडी, ता. माण, जि. सातारा येथे आयोजित केलेल्या सावित्रीमाई जयंतीच्या कार्यक्रमात अध्यक्षपदावरून त्या बोलत होत्या त्या पुढे म्हणाल्या की राजकारणात आता महिलांना 50 टक्के आरक्षण आहे त्याचा योग्य उपयोग करण्यासाठी महिलांनी शिक्षण घेतले पाहिजे व पुढची पिढी पण घडवली पाहिजे
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून दहिवडी नगरपंचायतीच्या नगरसेविका सौ उज्वला पवार,शिक्षक बँकेच्या माजी संचालिका सौ.सुजाता घोळवे,खाडे, महिला समुपदेशन केंद्राच्या समुपदेशक सौ आरती कदम,सपना तरटे, सानिका संस्थेच्या अध्यक्ष सौ सुजाता कदम यांनी राजमाता जिजाऊ,सावित्रीमाई ,महाराणी अहिल्याबाई होळकर,माता रमाई यांच्या विचारांचा वारसा घेऊन महिलांनी आपले जीवन व्यतीत करावे असे आवाहन केले
हृतिका माने या मुलीने सावित्रीमाई च्या जीवनकार्याची माहिती देऊन उपस्थितांची मने जिंकली
मनीषा जगदाळे,विजया भोसले,नीलम भोसले,ज्योती मिसळे,शीतल मिसळे,प्रियांका जाधव कल्पना खरात यांनी मनोगत व्यक्त केले
समय च्या सचिव भारती पवार यांनी संस्थेच्या एकल महिलासह सर्व महिलांच्या हक्क अधिकाराविषयी सुरू असलेल्या कामाची माहिती दिली.
कार्यक्रमास,वंदना कुंभार,राणी अवघडे,नीता गोळे,साधना खरात,वर्षा गुरव,आशा गोसावी,वर्षा जगदाळे,रंजना जाधव,प्रियांका जगदाळे,रेखा लोखंडे,ललिता शिंदे,सरस्वती अहिवळे,अंजली चव्हाण,रंजना काटकर,संगीता आवटे,अनुजा कुंभार,नीता गोसावी,लता केंगार,शैला काटकर,आशा लोखंडे,विश्रांती खरात इत्यादी महिला उपस्थित होत्या
संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब रणपिसे यांनी आभार मानले














