


बाळासाहेब ढोले, विशेष प्रतिनिधी मो. 78751 57855
पुसद-जिल्हा परिषद कर्मचारी क्रीडा मंडळ यवतमाळ यांच्या वतीने
आनंद महोत्सव सन २०२३-२४ अंतर्गत दि.२२डिसेंबर ते २५ डिसेंबर २०२३ या चार दिवशीय क्रिकेट स्पर्धा यवतमाळ येथे आयोजित करण्यात आली होती.
यामध्ये उत्कृष्ट खेळी खेळत फायनल सामन्यापर्यंत पोहोचलेल्या पंचायत समिती पुसद संघाने फायनल सामन्यामध्ये ११९ रणाचे टार्गेट दिले होते व ते टारगेट झरी पंचायत समिती संघाने पूर्ण करून विजय प्राप्त केला व यामध्ये पंचायत समिती पुसद संघाला उपविजेता पद मिळाले.
पं.स.पुसद गटविकास अधिकारी संजय राठोड यांनी संघाचे कौतुक केले. क्रीडा सचिव दीपक मेश्राम ,क्रीडा व्यवस्थापक पंजाब राठोड, तरसंघाची प्रमुख भूमिका निभवणारे मधुकर मोरझडे ,कर्णधार देवानंद रावते,उपकर्णधार अभिजित नवलकार व पुसद पंचायत समिती मधील क्रिकेट संघामध्ये संतोष तडसे,
इम्रान खान,परमेश्वर चव्हाण,नितीन राडकर,सुरेश डाखोरे,सचिन वाकोडे, सुनील वाडगे,दिनेश खेकाळे, तानाजी नवगिरे, संजय चव्हाण,विजय मार्कड, रणधीर आडे ,संजय मस्के,रणजीत राठोड,अमोल पवार,भागवत होगे, राम अवचार इत्यादी खेळाडूंनी सहभाग घेतला. यामध्ये उत्कृष्ट गोलंदाज देवानंद रावते,उत्कृष्ट किपर गौतम आळणे यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.














