Home यवतमाळ भारत सरकार शिष्यवृत्ती कार्यशाळा विद्यार्थ्यांनी महाडीबीटी संकेतस्थळावर अर्ज भरावा.

भारत सरकार शिष्यवृत्ती कार्यशाळा विद्यार्थ्यांनी महाडीबीटी संकेतस्थळावर अर्ज भरावा.

272

 

✒️सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ) मो.9823995466

पोफळी (दि. 14 डिसेंबर) उमरखेड तालुक्यातील श्री शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालय, पोफळी येथे भारत सरकार शिष्यवृत्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यशाळेची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून करण्यात आली.
कार्यशाळेकरिता सहा आयुक्त समाज कल्याण विभागाकडून श्री राहुल क-हाळे प्रकल्प अधिकारी मार्गदर्शक म्हणून लाभले.

कार्यशाळेअंतर्गत समाज कल्याण विभागा मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती योजनेची माहिती देण्यात आली.

प्रामुख्याने भारत सरकार शिष्यवृत्ती, छत्रपती राजर्षि शाहू महाराज शिष्यवृत्ती, योजना व त्या करिता लागणारे आवश्यक कागदपत्रांची माहिती देऊन उपस्थित विद्यार्थ्यांना महाडीबीटी संकेतस्थळवर भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज भरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आव्हान करण्यात आले.

भारत सरकार शिष्यवृत्ती योजना पासून विद्यार्थी वंचित राहू नये, करीता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

विष्णू सादुडे (मुख्यध्यापक) यांनी विद्यार्थ्यांना भविष्यात भारत सरकार शिष्यवृत्ती च्या माध्यमातून मदत होईल करिता महाडीबीटी पोर्टलवर भेट देऊन आपले अर्ज भरण्याच्या सूचना देऊन मार्गदर्शन करण्यात आले.

सदर कार्यशाळेकरिता श्री शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालयाचे विष्णू सादुडे (मुख्याध्यापक) राहुल क-हाळे प्रकल्प अधिकारी बार्टी यवतमाळ, विद्यालयतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, व एकूण 70 विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

शेवटी विद्यालयाच्या वतीने उपस्थितांचे आभार मानून कार्यशाळेची सांगता करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here