Home यवतमाळ नवल बाबा वार्ड येथे दहा दिवशीय धम्म प्रशिक्षण शिबिराचे उध्दघाटन

नवल बाबा वार्ड येथे दहा दिवशीय धम्म प्रशिक्षण शिबिराचे उध्दघाटन

190

 

बाळासाहेब ढोले, विशेष प्रतिनिधी मो. 78751 57855

पुसद- दि बुध्दिष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा यवतमाळच्या विद्यमाने व तालुका शाखा पुसद यांच्या अंतर्गत नवल बाबा वार्ड येथील न्यु पंचशील बुध्दविहारात दहा दिवशीय उपासक उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन दि.११ डिसेंबर २०२३ रोजी करण्यात आले.

तालुका शाखा पुसद यांच्यावतीने आतापर्यंत ५५ गावामध्ये दहा दिवशीय उपासक- उपासिका धम्मप्रशिक्षण शिबिर घेण्यात आली. तर ५६व्या दहा दिवशीय धम्मप्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्योती चोपडे, उद्घाघाटक शहराध्यक्ष ल.पु.कांबळे, मार्गदर्शक केंद्रीय शिक्षिका ज्योती कुंटे नांदेड तर प्रमुख आतिथी प्रचार व पर्यटन जिल्हा सचिव भगवान बरडे, तालुकाध्यक्ष माजी सैनिक भारत कांबळे, अधिक्षक डॉ .बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृह विजय बहादूरे, प्रल्हाद खडसे,रंगराव बनसोड,राजु पारसकर,बळीराम चोपडे, गजानन इंगोले, विशाल चोपडे हे मान्यवर उपस्थित होते.
या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

उपस्थित मान्यवरांनी या दहा दिवशीय धम्म प्रशिक्षण शिबिरास शुभेच्छा पर मार्गदर्शन केले. ज्योती चोपडे यांनी अध्यक्षीय भाषणात या शिबिरास उपासक-उपासिका यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी जि.प.सदस्य भोलेनाथ कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन तुकाराम चौरे यांनी केले तर आभार कमल पाईकराव यांनी मानले. या कार्यक्रमाची सांगता सरणतय गाथेने करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here