


✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ) मो.9823995466
दिग्रस (दि. 1 नोव्हेंबर) दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका शाखा दिग्रस येथे आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा पर्यंत चालू असलेला वर्षावास समारोपीय कार्यक्रम नुकताच संपन्न झाला .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विनायक देवतळे अध्यक्ष तालुका शाखा दिग्रस हे होते.
या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते रवी भगत अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा यवतमाळ,ग्रंथवाचक तुकाराम उबाळे प्रमुख उपस्थिती कवी महादेव धुळध्वज, डॉ वाल्मिक इंगोले हे होते . तथागत भगवान गौतम बुद्ध,सम्राट अशोक व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून वंदना घेण्यात आली.
रवी भगत यांनी बौद्ध धर्मातील खास वैशिष्ट्ये या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.धम्म हा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तालुका शाखेने प्रयत्न केले पाहिजे.विहाराचे पावित्र्य राखायचे असेल तर सर्वांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून यावे असे आवाहन त्यांनी केले.
विनायक देवतळे यांनी अध्यक्षीय भाषणातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा देऊन 67 वर्ष झाले तरी आपण डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला समाज निर्माण करू शकलो नाही याचेही आपण चिंतन केले पाहिजे.आपल्या समाजातील लोक आजही अंधश्रद्धे मध्ये गुरफटले आहे.त्यांना त्यामधुन बाहेर काढणे हे आपले कर्तव्य आहे.
असे विचार देवतळे सरांनी व्यक्त केले.या वेळी किसनराव हस्ते व दामुजी खंडारे यांचा शाखेच्या वतीने धम्म भुषण गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच तुकाराम उबाळे ग्रंथवाचक यांचाही शाल देऊन सत्कार करण्यात आला.लता भरणे यांनी स्वागत गीत सादर केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा डॉ गौतम जयगावकर संचलन एकनाथ मोगले आभार यशवंत भरणे यांनी केले कार्यक्रमाच्या व्यवस्थेसाठी रमेश वहिले, यशवंत भरणे, मोतीराम अगमे,केशव बोधडे, निवृत्ती बाराहाटे,चिंतामन मनवर, प्रदिप नगराळे, उत्तम इंगोले, तुकाराम उबाळे, चंद्रमणी धुळध्वज, पुरुषोत्तम मेश्राम, देविदास खंदारे,नंदु गुजर, सुनीलकुमार मोरे, किशोर कदम, लताबाई भरणे, सुनिता मनवर, ज्योती वहिले, अनुसया वाठोरे,वर्षा वागदे,रंगारी ताई, इंगोले ताई, योगीता भवरे इत्यादींनी परिश्रम घेतले सर्व बौद्ध बांधवांना भोजनदान देण्यात आले.
वर्षावास कार्यक्रमाला धम्मदान देणाऱ्या सर्व बौद्ध बांधवाचे आभार माणून सरणतयगाथेने कार्यक्रमाची सांगता झाली.














