Home महाराष्ट्र पी जी माळी यांच्याकडून महात्मा फुले हायस्कूल शाळेच्या ग्रंथालयाला अनमोल ग्रंथसंपदा भेट...

पी जी माळी यांच्याकडून महात्मा फुले हायस्कूल शाळेच्या ग्रंथालयाला अनमोल ग्रंथसंपदा भेट !….

200

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी. पाटील)

धरणगांव(दि.14ऑक्टोबर): – वाचाल तर वाचाल या उक्तीप्रमाणे धरणगाव येथील लहान माळीवाडा परिसरातील रहिवासी पी जी माळी ( ह.मु.कल्याण ) यांच्याकडून सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेच्या ग्रंथालयाला अनमोल ग्रंथसंपदा तसेच विविध सामाजिक – शैक्षणिक कात्रणांचे ८ संच भेट देण्यात आले.

पी जी माळी काका यांचे वय वर्ष ८५ असून देखील सामाजिक – शैक्षणिक क्षेत्रात ते अग्रेसर आहेत दरवर्षी शाळेला नवनवीन लेख, कात्रण, अनमोल ग्रंथसंपदा ते शाळेला भेट देत असतात ८५ वर्षाचे असून देखील त्यांची ऊर्जा तरुणांना लाजवणारी आहे. वाचन प्रेरणा दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी कल्याण हून ही ग्रंथसंपदा शाळेला भेट केली.

शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद व ग्रंथपाल गोपाल महाजन यांनी ही अनमोल ग्रंथसंपदा भेट स्वीकारली. आम्हा शिक्षकांना व आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना ही ग्रंथसंपदा प्रेरणादायी ठरेल असे प्रतिपादन शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार यांनी केले व पी.जी माळी यांचे भ्रमणध्वनीवरून आभार देखील मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here