Home Breaking News कर्नाटक राज्य प्रमाणे धनगर समाजाला अनुसूचित जमाती आरक्षणाच्या प्रभागात टाका ज्येष्ठ नेते...

कर्नाटक राज्य प्रमाणे धनगर समाजाला अनुसूचित जमाती आरक्षणाच्या प्रभागात टाका ज्येष्ठ नेते मा.विठ्ठलराव रबदडे.

233

 

अनिल साळवे, विशेष प्रतिनिधी मो. 86985 66515

गंगाखेड (प्रतिनिधी ) आरक्षणाच्या प्रश्नावर सर्व देशभरात चर्चा सुरू असताना आमचे बांधव सुरेश बंडगर आपल्या सहकार्यासोबत आरक्षण प्रश्नावर चौंडी येथे लढा देत आहेत परंतु या बाबीकडे महाराष्ट्र सरकार गांभीर्याने पहात नाही. यापूर्वीही महाराष्ट्र राज्यात विविध पक्षाचे सरकार आले असता आरक्षणाचे आश्वासन दिल्याशिवाय काहीही दिले नाही.त्यामुळे महाराष्ट्र राज्य सरकारने धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर विशेष अधिवेशन बोलून कर्नाटक राज्य प्रमाणे धनगर समाजाला अनुसूचित जमाती मध्ये समाविष्ट करून आरक्षण देण्यात यावे. अन्यथा धनगर बांधवांच्या वतीने महाराष्ट्र भर आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला. आरक्षण प्रश्नावर धनगर समाज बांधवांच्या वतीने हजारो बांधव उपस्थित असून याप्रसंगी ज्येष्ठ नेते विठ्ठलराव रबदडे, भैय्यासाहेब भालेराव, जीतेश गोरे, नारायण सरोदे, नारायण घनवटे, उद्धव शिंदे, जयवंत कुंडगीर, जयदेव भिसे, बालासाहेब नेमाने, मुंजाभाऊ लाडे, समाधान चिलगर, हनुमंत देवकते, बालासाहेब देवकते, गोविंद खडके, मोतीराम देवकते,बालासाहेब टेकाळे, अंकुश आळसे,गोविंद शेवाळ, नारायणराव शिंदे, वैजनाथ भंडारे, पिराजी शिंपले, अशोक गाढवे इत्यादींची उपस्थिती होती.आरक्षण प्रश्नावर हा मोर्चा अहिल्यादेवी होळकर यांच्या चौकातून निघाल्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये आल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. डॉ.आंबेडकर चौकातून थेट परळी मार्गे महाराणा प्रताप चौकामध्ये जवळपास एक तास रस्ता रोको करण्यात आला. महाराणा प्रताप चौकामध्ये सभेचे स्वरूप आल्यानंतर वरील मान्यवरांनी मार्गदर्शनही केले. याप्रसंगी बोलतअसताना जेष्ठ विठ्ठलराव रबदडे यांनीही मनोगत व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here