Home महाराष्ट्र पवन मोरे कुस्तीत जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला

पवन मोरे कुस्तीत जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला

148

बळवंत मनवर/पुसद
पुसद क्रिडा युवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रिडा अधिकारी यवतमाळ येथे घेण्यात आलेल्या जिल्ह्य़ा स्तरीय शालेय कुस्ती ग्रीकोरोमन स्पर्धेत कुस्ती खेळासाठी नावलौकिक असलेल्या नानंद येथील व सद्या महात्मा मुंगसाजी प्रथमिक माध्यमिक आश्रम शाळा स्व नामदेवराव मळघणे कनिष्ठ महाविद्यालय मरसुळ येथील इयत्ता दहावीतील पवन सुदाम मोरे यांची जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक पटकावून विभागीय स्तरावर निवड झाली असून त्यांनी या यशाचे श्रेय नानंदचा प्रसिद्ध कुस्तीगीर चारवेळा आंतराष्ट्रीय पातळीवरील भारताचे प्रतिनिधित्व करणारा पैहलवान अनिल तोरकड तसेच महाराष्ट्र चॅम्पियन्स संजय श्रिपती मोरे प्रशिक्षक यांना दिले असून या यशाबद्दल गावातील नरेंद्र विठठल मार्कड , नारायण सूर्यभान बोडखे, पालक सुदाम मोरे तसेच महात्मा मुंगसाजी प्रथमिक माध्यमिक आश्रम शाळेचे संचालक बबलु मळघणे, मुख्याध्यापक सयद, परसोले, चव्हाण, व शिक्षकवृंद गावकरी आनंद व्यक्त करुन अभिनंदन करून पुढील बुलढाना येथे होणाऱ्या विभागीय स्तरावरील स्पर्धे करीता खुप खुप शुभेच्छा दिल्या दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here