


✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.19ऑगस्ट):-अंधश्रद्धा निर्मूलन समिती परभणी व भारतीय बौद्ध महासभा शाखा गंगाखेड यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.नरेंद्र दाभोळकर यांचा दहावा स्मृतिदिन व राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिनानिमित्त वैज्ञानिक दृष्टिकोनावर सहप्रयोग व्याख्यानाचे फुलेनगर गंगाखेड येथे आयोजन केले असून सर्व फुले,शाहू,आंबेडकर अनुयायी यांनी सप्रयोग व्याख्यानाचा आवश्यक घ्यावा असे आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे नवनाथ साळवे,अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते पत्रकार राहुल साबणे यांनी केले आहे.
सहप्रयोग व्याख्यानाचे अध्यक्ष स्थानी बौद्ध उपासक शामराव नरवाडे हे राहणार असून प्रमुख व्याख्याते म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारी समिती सदस्य,मुंजाजी कांबळे,सप्रयोग व्याख्याते अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश शिंगाडे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.तरी सर्व गंगाखेड शहरातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते,बौद्ध उपासक,उपासिका यांनी 20 ऑगस्ट रोजी रविवारी सायंकाळी सात वाजता वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन बौद्धाचार्य जोंधळे यांनी केले आहे.














