Home महाराष्ट्र म्हसवड बस स्थानकाचे काम त्वरित सुरु करणेसाठी विविध पक्ष संघटनाचे जिल्हाधिकारी यांना...

म्हसवड बस स्थानकाचे काम त्वरित सुरु करणेसाठी विविध पक्ष संघटनाचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

355

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.19ऑगस्ट):-म्हसवड येथील रखडलेल्या बस स्थानकाचे काम तातडीने पूर्ण करून यास जबाबदार असणाऱ्या प्रशासकीय अधिकारी व ठेकेदार यांचेवर कारवाई व्हावी या मागणीचे निवेदन माण तालुक्यातील विविध पक्ष संघटनानी सातारा जिल्हाहिकारी यांना दिले

सदर निवेदनात म्हटले आहे कि म्हसवड बसस्थानकाचे काम गेले कित्येक वर्षे रखडले आहे .हे काम पूर्ण व्हावे अशी मागणी विविध पक्ष ,संघटना,यांनी वेळोवेळी केली आहे .उन्हाळा ,पावसाळा,हिवाळा या ऋतूमध्ये बसस्थानकाची हालत व प्रवाशांचे होणारे हाल यावर पत्रकारांनी प्रकाश टाकला आहे तरी सुद्धा अद्याप कामाला गती मिळाली नाही. या विषयास अनुसरून सामाजिक कार्यकर्ते मा.अजिनाथ लक्ष्मण कवटे हे दिनांक १४/०८/२०२३ पासून ते बेमुदत आंदोलनात बसले असून त्यांच्याही आंदोलनाची संबंधित प्रशासनाने अद्याप पर्यंत कोणतीही दखल घेतली नाही.यावरून प्रशासन किती गेंड्याच्या कातडीचे व ठेकेदार किती मुजोर आहे हे दिसून येत आहे.

म्हसवडचे बसस्थानक खोलगट भागात आहे पावसाच्या दिवसात परिसरातून पाणी गोळा होऊन स्टँड मध्ये साचते चिखल होतो व याच चिखलातून प्रवाशांना मार्ग काढावा लागतो व निवारा नसलेमुळे भरपावसात भिजत उभे राहावे लागते व थंडीमध्ये काकडत राहावे लागते. तसेच प्रवाशांना उन्हामध्ये ताटकळत उभे राहवे लागत आहे.

सदर परिसरात असणाऱ्या संडास व मुतारीची अवस्था अत्यंत वाईट असल्याने प्रवासी महिलांची प्रचंड कुचुंबना होत आहे.
या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार व्हावा व रखडलेले बसस्थानकाचे काम सुरू करून पूर्ण करणेत यावे व याला जबाबदार असणारे प्रशासकीय अधिकारी व ठेकेदार यांचेवर कडक कारवाई करावी या मागणीसाठी विविध संघटनांचे वतीने मंगळवार दि.२२/०८/२०२३ रोजी म्हसवड बंद आव्हान व बुधवार दि.२३/०८/२०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता म्हसवड बसस्थानक परिसरात ,सातारा पंढरपूर रोडवर मुख्य चौकात रास्ता रोको आंदोलन करणेत येणार आहे. सदर आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी आपल्यावर राहील.

यावेळी वंचीत बहुजन आघाडी माण तालुका अध्यक्ष युवराज भोसले, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष सनी तुपे, दलित पॅन्थर पश्चिम म्हराष्ट्र अध्यक्ष प्रमोद लॉखांदे व इतर पदाधिकारी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here