Home महाराष्ट्र सेंदूरवाफा बिरसामुंडा चौकात जागतिक आदिवासी दिन

सेंदूरवाफा बिरसामुंडा चौकात जागतिक आदिवासी दिन

182

✒️किशोर बावणे(विशेष प्रतिनिधी,साकोली)मो:-7350793187

साकोली (दि.10ऑगस्ट):- ०९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी बिंझवार आणि आदिवासी गोंड समाजातर्फे बिरसा मुंडा चौक सेंदुरवाफा व साकोलीतील लाखांदूर रोड येथे मूर्तीचे पूजन करून जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला.

याप्रसंगी बिंझवार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. आदिवासी समाजाविषयी अडचणी जाणून त्यांच्यावर चर्चा करण्यात आली.

तसेच “एक तिर एक कमान, सब आदिवासी एक समान” असे घोषवाक्य देत सर्व आदिवासी बिंझवार आणि आदिवासी गोंड समाजातर्फे मणिपूर येथे झालेल्या आदिवासी महिलेवर अत्याचार प्रकरणी दोषींना फाशीची शिक्षा व्हावी म्हणून साकोली तहसीलदार मार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले.

निवेदन देते वेळी दोन्ही समाजातील बांधव उपस्तिथ होते, यात बिंझवार समाजाचे काशीराम वाहारे, हिरामण सोनवाने, विष्णु चौधरी, कार्तिक लांजेवार, राजेश सोनवाने, उत्तम लांजेवार, निशा सोनवणे, मिना सोनवणे, महिंद्रा चौधरी, राजेश सोनवणे, विलास बागडे, हिवराज मेश्राम, रवि चौधरी आदिवासी गोंड समाजाकडून गिरधर इळपाते, अमोल इळपाते, गिरीश वरकडे, उमराव वरकडे, सुभाष न्यायमूर्ती तसेच आमंत्रित फ्रिडम युथ फाऊंडेशन साकोली अध्यक्ष किशोर बावणे हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here