Home महाराष्ट्र ॲड.मिलिंद क्षिरसागर ‘द सोल्जर ऑफ कॉन्सिट्युशन’ पुरस्काराने सन्मानित

ॲड.मिलिंद क्षिरसागर ‘द सोल्जर ऑफ कॉन्सिट्युशन’ पुरस्काराने सन्मानित

245

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.10ऑगस्ट):-येथील न्यायालयातील जेष्ठ विधिज्ञ आणि आ.डॉ.गुट्टे यांचे कायदेशीर सल्लागार ॲड.मिलिंद भगवानराव क्षिरसागर यांना ऑल इंडिया फेडरेशन ऑफ एडवोकेट ॲन्ड असोसिएशन दिल्ली या नामांकित संस्थेने ‘द सोल्जर ऑफ कॉन्सिट्युशन’ पुरस्काराने नुकतेच सन्मानित केले आहे.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ॲड.रवि जाधव, न्यायाधीश यशवंत चावरे, गुलाबराव अवसरमल, ॲड.रोशन लाल, ॲड.सत्यप्रकाश गौतम, ॲड.मदनलाल कलकल, ॲड.धनीराम बंजारे, ॲड.सुनील भालेराव, ॲड.सुमंगल शिंदे, उद्योजक संजय गायकवाड, ॲड.रंजना भोसले, ॲड.महेश वासवानी, ॲड.एकनाथ सावंत, ॲड.मोहन गवई, ॲड.अमोल डिमीकर, ॲड.सुहास रावळे, संस्थेचे उपाध्यक्ष ॲड.प्रकाश जगताप, ॲड.क्रांती रोबे उपस्थित होते.

संविधानाच्या घटनात्मक मूल्यांसाठी परिश्रम घेवून सामाजिक बांधिलकीने वकीली व्यवसायात कार्यरत असलेल्या देशभरातील निवडक १०१ विधिज्ञांना कल्याण येथील आचार्य अत्रे सभागृहात पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यात ॲड.मिलिंद क्षिरसागर यांचा समावेश आहे. ते गेल्या १५ वर्षांपासून वकीली क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांचा उत्तम जनसंपर्क आहे. सामाजिक क्षेत्रातील तरूणांशी त्यांचा चांगला संवाद आहे. सध्या ते आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांचे कायदेशीर सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.

ॲड.क्षिरसागर हे फुले, शाहू, आंबेडकर व छ.शिवाजी महाराज यांच्या विचारधारेचे कृतीशील अनुकरण करणारे विधिज्ञ आहेत. वकीली क्षेत्रासह विविध विषयांवर त्यांचा चांगला अभ्यास आहे. सामाजिक उपक्रम व कार्यक्रमाची त्यांना विशेष आवड आहे. त्यामुळे मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठानचे सचिव म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे. ते प्रेमळ आणि मनमिळावू स्वभावाचे गोड व्यक्ती आहेत. त्यामुळे पुरस्कारासाठी त्यांची झालेली निवड अतिशय सार्थ आहे, असे गौरवोद्गार युवा उद्योजक सुनील भैय्या गुट्टे यांनी काढले.

दरम्यान, ॲड.क्षिरसागर यांच्या पुरस्कार‌ प्राप्तीमुळे जेष्ठ मुख्याध्यापक माणिक नागरगोजे, जनसंपर्क अधिकारी हनुमंत लटपटे, कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हनुमान जाधव, ॲड.अनिल सावंत, ॲड.राम गायकवाड, पत्रकार पिराजी कांबळे, रेल्वे अधिकारी शिवाजी दौंड, स्वीय सहाय्यक कवी विठ्ठल सातपुते, जय मिजगर, गोपी नेजे, महादेव शिंदे, ॲड.सुनिल कागणे, ॲड.जितेंद्र सोनसळे, राहूल काचोळे, बाबा पोले, राजेबापू सातपुते, विजय साळवे, ॲड.भागवत मुंडे, ॲड.अमोल गायकवाड, ॲड.संतोष मुंढे, ॲड.विवेक निळेकर, प्रभाकर सातपुते, इंजिनिअर मिलिंद पारवे, अनिल मस्के यांनी त्यांचे पेढे भरवून अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here