


✒️सुयोग सुयोग डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमूर(दि.9ऑगस्ट):-आठवले समाजकार्य महाविद्यालय चिमुरच्या वतीने ९ ऑगस्टला हुतात्मा स्मारक चिमुर येथे महाविद्यालयाचे कर्मचारी डॉ. संजय पिठाडे, डॉ. चंद्रभान खंगार, राष्ट्रीय विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक मुस्तकीम पठाण यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून मौन श्रध्दांजलीचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन स्वातंत्र्य संग्राम सैनिक सेलच्या प्रमुख डॉ. रागीणी मोटघरे यांनी केले.
यावेळी कार्यालयीन अधिक्षक सुभाष शेषकर, डॉ. दिवाकर कुमरे तसेच शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व नागरिकांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर महाविद्यालयात आदिवासी दिनानिमित्य भगवान बिरसामुंडा यांच्या जयंतीनिमित्य त्यांच्या प्रतिमेला डॉ. सुनिल झाडे यांच्या हस्ते मालार्पण करण्यात आले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.














