Home महाराष्ट्र शेतात वीज कोसळल्याने महिलेचा मृत्यू

शेतात वीज कोसळल्याने महिलेचा मृत्यू

271

🔺ब्रम्हपुरी तालुक्यातील बेटाळा शेतशिवारातील घटना

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रह्मपुरी(दि. 26 जुलै):- तालुक्यातील बेटाळा ते पारडगाव रस्त्याला लागून असलेल्या गावातीलच दुसऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात धान पिकाच्या दहावीस महिलांच्या टोळीने रोवणी कामासाठी गेलेल्या दहा-बारा महिला पैकी एका महिलेवर वीज कोसळून महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी तीन वाजेच्या दरम्यान बेटाळा शेत शिवारात घडली. गीता उर्फ प्रांजली पुरुषोत्तम ढोंगे वय ( 41) असे मृतक महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार सध्या ब्रह्मपुरी तालुक्यात धान रोवणी व निंदन काम मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. मात्र गेल्या आठवडाभरापासून परिसरात मोठ्या प्रमाणात मेघगर्जना व विजांच्या कडकडाडासह मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असून त्यामुळे ब्रह्मपुरी परिसरात कामाची सध्या लगबग वाढली आहे.

प्रांजली उर्फ गिताबाई पुरुषोत्तम ढोंगे ही महिला मोलमजुरीसाठी गावातीलच दुसऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात मजुरीवर गेली असल्याची माहिती प्राप्त झाली असून 26 जुलै 2023 ला बुधवारी दुपारच्या दरम्यान अचानक विजांचा कडकडाडा सह पाऊस सुरू झाला व शेतात काम करीत असलेल्या गीता पुरुषोत्तम ढोंगे या महिलेवर वीज कोसळली त्यात तिचा जागीच मृत्यू झाला आहे. सदर घटनेची माहिती महसूल विभाग व पोलीस विभागाला देण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे माहितीनुसार परिवारात सदर महिलेचे पती व दोन मुली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here