


(अन्यथा तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा)
✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466
ढाणकी(दि.11जुलै):- ढाणकी हे मोठ्या बाजारपेठेचे स्थळ त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात लोक बाजार इतर कामासाठी येतात.सावळेश्वर येथील नागरिकांना कोणत्याही लहान असो किंवा मोठा काम असो त्यानिमित्य ढाणकी येथे यावं लागते.पण ढाणकी ते सावळेश्वर रस्त्याची एवडी दुर्दैशा झालेली आहेकी, जर एखादा माणूस टुव्हिलर वर बसून येत असेल तर त्या टुव्हिलर वाल्याच्या केव्हा अपघात होईल हे कळू शकणार नाही ऐवड्या खराब दर्जेचा रस्ता ठेकेदाराने बनवत आहे.
तरी शासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. सावळेश्वर रस्ता चांगला मुरूम टाकून उच्च दर्जाचा बनवा.अन्यथा तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा भाविकभाऊ भगत यांनी दिला.
फक्त काळी माती टाकून रस्ता ठेकेदार बनवत आहे याची दखल कोणी घेत नाही. हा रस्ता जर काळी माती टाकून बनवला तर तो दीर्घकाळ टिकणार नाही त्यामुळे सावळेश्वर येथील रहिवासी तथा आजूबाजूंच्या शेतकऱ्यांना पुन्हा रस्त्यामुळे त्रास होईल त्यामुळे हा रस्ता उच्च दर्जाचा बनून दीर्घकाळ टिकावा याची मागणी भाविक भगत यांच्या वतीने करण्यात आली.
या वेळेस उपस्थित भाविकभाऊ भगत हेल्प फाऊंडेशन युवा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष भाविक भगत, जिल्हाध्यक्ष अनुपभाऊ शेखावत जिल्हा उपाध्यक्ष विष्णू चौधरी तालुका अध्यक्ष राजकुमार शिरगरे विधार्थी संघटना तालुका उपाध्यक्ष विजय अवधूत तालुका उपाध्यक्ष विनोद वाढवे, तालुका संघटक विवेक रावते, सावळेश्वर गावचे परमेश्वर रावते, हर्षल काळबांडे, अंकुशकाळबांडे ग्रामपंचायत सदस्य शिद्धोधन काळबांडे, प्रशांत प्रकाश पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य बाळु सादलवाड,राष्ट्रपाल काळबांडे हे उपस्थित होते.













