


उमरखेड:- ब्राह्मणगाव येथील हिंदू मोक्षदाम सौंदर्यकरण समितीच्या वतीने मागील 2021 पासून हिंदू मोक्षदाम समिती मध्ये वृक्ष लागवड करून सौंदर्यीकरण करण्याचे ठरविण्यात आले होते. सरपंच परमात्मा जी गरुडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली समिती गटीत करण्यात आली. त्या सौंदर्यकरणाच्या कामाला आज दोन वर्षे पूर्ण होत असल्यामुळे दुसरा वर्धापन दिन व झाडांचा वाढदिवस सहकार्याने पार पाडण्यात आला त्या कार्यक्रमासाठी सरपंच परमात्माजी गरुडे साहेब तंटामुक्ती अध्यक्ष अशोक निमलवाड,माजी सरपंच गुलाबखा पठाण, ग्रामपंचायत सदस्य शेख कदीर,सामाजिक कार्यकर्ते यांनी वृक्षारोपण केले.
यावेळी आपले विचार मांडताना समितीचे सदस्य शिवाजी रंदे यांनी वर्धापन दिनानिमित्त सर्व वृक्षप्रेमी नागरिक व समिती तसेच समितीला सहकार्य करणाऱ्या सदस्यांना शुभेच्छा दिल्या.हिंदू शमशानभूमी सौंदर्यकरण्याचे काम पुढेही अविरत सुरू राहील अशी ग्वाही संस्थेचे सचिव रविराज धबडगे यांनी दिली. औषध वर्गीय,फळवर्गीय, फुलवर्गीय असे एकूण 600 वृक्ष लावून मोक्षधामला नावलौकिक मिळवून देण्यात समितीचा सिंहाचा वाटा आहे असे त्यांनी सांगितले. या सौंदर्यकरणाच्या कामामध्ये ग्रामपंचायत कार्यालय व सर्व सदस्य व ग्रामस्थांचा फार मोठा वाटा आहे या सौंदर्यकरणासाठी नव संजीवन संस्था नाशिक तर्फे पुरस्कार व स्वर्गीय भाऊसाहेब माने कृषी गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यासाठी समितीचे अध्यक्ष गजानन कोंडरवाड,उपाध्यक्ष विठ्ठल गंधपवाड, सदस्य गजानन मुक्कावार, सोनबा घोडेकर, अमोल मोरे सर, नयन पुदलवाड,विश्वंभर लंकलवाड सर ,बाबू कदम,पंकज कनकापुरे, तुकाराम पावडे, कैलास कोंडरवाड सर व समस्त गावकरी उपस्थित होते.












