Home चंद्रपूर सहा वर्षीय मुलाच्या अपघात प्रकरणातील आरोपीस न्यायालयाने ठोठावली शिक्षा

सहा वर्षीय मुलाच्या अपघात प्रकरणातील आरोपीस न्यायालयाने ठोठावली शिक्षा

223

रोशन मदनकर (उप संपादक) मो. 88886 28986
ब्रम्हपुरी(दि.18 मे ):-दिवाणी व फौजदारी न्यायालय ब्रम्हपुरी येथे भांदवी कलम 279, 304 (अ) अन्वये फौजदारी मामला क्रमांक 131/2022 प्रलंबित होता. मामल्यातील फिर्यादी गणेश जीवन ढोरे राह. सोनेगाव यांनी आरोपी विनोद मुर्लीधर तलमले राह. सावलगाव याच्याविरुद्ध स्वतःच्या ताब्यातील ट्रॅक्टर निष्काळजीपने चालवून फिर्यादी व त्याच्या सहा वर्षीय मुलाला ट्रॅक्टर खाली दाबले. यात सहा वर्षीय मुलाला गंभीर दुखापत झाली, त्यामुळे त्याला गंभीर अवस्थेत दवाखान्यात भरती करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. त्यामूळे फिर्यादी यांनी आरोपी विरुध्द फिर्याद दाखल केली व आरोपीविरुद्ध मिळुन आलेल्या भक्कम पुरावाच्या आधारे न्यायाधीश श्री.आर.एन.पाठक यांनी आरोपी विनोद मुर्लीधर तलमले राह. सावलगाव याला कलम 279 अन्वये 6 महिन्याची शिक्षा व 500 रुपये दंड तसेच कलम 304 (अ) अन्वये 2 वर्षाची शिक्षा व 500 रुपये दंड व दंडाची रक्कम न भरल्यास 1 महिन्याचा साधा कारावासाची सुनावली. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र उपरे व हेड कॉन्स्टेबल अरुण पिसे यांनी केला तर सरकार पक्षातर्फे ॲड.गणेश राऊत यांनी काम बघितले. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुधाकर आंभारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली व कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पो. हवा. सुदेश कुमरे आणि पो. हवा. ध्रुवबाळ पिलारे यांनी काम बघितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here