Home चंद्रपूर चंद्रपूर अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालयाचे स्थानांतरण

चंद्रपूर अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालयाचे स्थानांतरण

211

उपक्षम रामटेके, सहसंपादक मो. 98909 40507
चंद्रपूर, : अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालय 7 जुलै 2022 पासून जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, प्रशासकीय भवन, दुसरा माळा, चंद्रपूर येथे सुरू करण्यात आले होते.

सदर समिती कार्यालय 2 मे 2023 पासून एस.पी.लॉ कॉलेजमागे डॉ.ए.पी. पिल्लई आय.टी.आय कॉलेजच्या वर दुसरा माळा, छत्रपती नगर, ताडोबा रोड, तुकुम, चंद्रपूर येथे स्थानांतरण करण्यात आले आहे. याची सर्व आदिवासी बांधवांनी नोंद घ्यावी. कार्यालयीन कामकाजाशी संबंधित संपर्क साधावयाचा असल्यास अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या संशोधन अधिकारी वैशाली गोहत्रे 8329427147, अनिल पवार 9923773770 यांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे चंद्रपूर, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या संशोधन अधिकारी वैशाली गोहत्रे यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here