Home Breaking News गंगाखेड नगरपालिकेकडून दिव्यांगांना निधी मिळे ना निधीसाठी दिव्यांगाचे नगरपालिकेला हेलपाटे.

गंगाखेड नगरपालिकेकडून दिव्यांगांना निधी मिळे ना निधीसाठी दिव्यांगाचे नगरपालिकेला हेलपाटे.

115

(गंगाखेड प्रतिनिधी/अनिल साळवे)

गंगाखेड – सामाजिक न्याय विभागाअंतर्गत दिव्यां गाच्या समस्येवर मदत निधी म्हणून दिव्यांगांना अनुदान दिले जात असून नगरपालिकेच्या वतीने प्रतिवर्षी दिव्यांगाच्या समस्येवर पाच टक्के निधी खर्च करण्यात येत असतो काही जणांना निधी मिळाला असून तीस ते 40 जणांना अजूनही निधी वितरित केला नसल्याचे दिव्यांगाने सांगितले .गंगाखेड नगर परिषद च्या वतीने एकूण दिव्यांगांचे अर्ज पाहता दोनशे जणांना निधी मंजूर केल्याचे संबंधित विभागाच्या वतीने कळविण्यात आले परंतु तीस ते चाळीस दिव्यांगणना अजूनही निधी वितरित केला गेला नाही असे बँकेच्या वतीने आम्हाला कळविण्यात आले आहे.बँकेच्या वतीने तांत्रिक अडचण सांगत असताना नगरपालिकेच्या वतीने चुकीचे खाते क्रमांक,आधार लिंक नसलेले खाते नगरपालिकेच्या वतीने पाठवण्यात आलेली आहे दिव्यांग नागरिक यांनी सांगितले. संबंधित विभागाशी चर्चा केली असता उरलेल्या काही दिव्यांगांना येणाऱ्या 15 ऑगस्ट रोजी नवीन मंजुरी देऊन निधी वितरित केला जाणार आहे असे दिव्यांग विभागाचे प्रमुख तातोडे यांनी प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले. दिव्यांगांमध्ये काहीजणांनी सर्व कागदपत्रे देऊनही त्यांचाही निधी आलेला नाही त्याबद्दल दिव्यांगाच्या वतीने नाराजी व्यक्त केली जात आहेे दिव्यांगाच्या प्रश्नाची मुख्याधिकारी यांनी दखल घेऊन न्याय मिळवून द्यावा असे दिव्यांना वाटते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here