Home चंद्रपूर अखेर भूती नाल्याला पाणी सुटले माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांच्या मागणीची...

अखेर भूती नाल्याला पाणी सुटले माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांच्या मागणीची तात्काळ दखल भाजपा तालुकाध्यक्ष प्राचार्य अरुण शेंडे यांचेसह तालुक्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांनी मानले अतुल भाऊंचे आभार

144

 

रोशन मदनकर (उप संपादक) मो. 88886 28986
ब्रम्हपूरी(दि.21 एप्रिल):-
गेल्या काही दिवसांपासून वर्तमानपत्रांमध्ये भुतिनाला कोरडा पडला असून, भूती नाल्याला पाणी सोडण्यात यावे याबाबत जवळपास प्रत्येकच वर्तमानपत्रात बातम्या प्रसारित होत होत्या. वाढत्या उन्हाचा तडाका आणि कोरडा भुतिनाला वरून परिसरातील जनतेची आर्त हाक,गुराढोरांना पिण्याच्या पाण्याची समस्या, यांची दखल घेऊन भाजयूमोचे जिल्हा सदस्य लीलाराम राऊत यांनी प्रा.अतुल भाऊ देशकर यांना या समस्येविषयी अवगत केले असता लागलीच भाऊंनी गोसे खुर्द उजव्या कालव्याचे कार्यकारी अभियंता श्री. शर्मा यांचेशी कान्फर्न्स चर्चा करून परिसरातील जनतेच्या भावना कळविल्या, पाण्याच्या समस्येने जनता किती त्रस्त आहे हे कार्यकारी अभियंता श्री. शर्मा यांना पटवून दिले.आणि श्री.शर्मा यांनी देखील वेळीच दखल घेऊन भूती नाल्याला पाणी सोडण्याचे महान कार्य केले
याबद्दल प्रा.अतुलभाऊ देशकर,प्रा.प्रकाश बगमारे प्रदेश सदस्य भाजपा ओबीसी मोर्चा, प्राचार्य अरूणजी शेंडे तालुकाध्यक्ष भाजपा ब्रह्मपुरी, इंजिनियर अरविंद नंदुरकर शहराध्यक्ष भाजपा, रामलाल दोनाडकर तालुकाध्यक्ष भाजयुमो ब्रह्मपुरी , डॉ.प्रा. अशोक सालोटकर भाजपा ओबिसी मोर्चा ब्रह्मपुरी शहर,मनोज वठे भाजपा महामंत्री तथा नगरसेवक ब्रह्मपुरी, मनोज भुपाल जिल्हा महामंत्री भाजपा ओबीसी मोर्चा तथा महामंत्री भाजपा ब्रम्हपूरी शहर, साकेत भानारकर,प्रेमलाल धोटे तालुकाध्यक्ष भाजपा ओबिसी मोर्चा,यशवंत आंबोरकर महामंत्री भाजयुमो ब्रह्मपुरी, ज्ञानेश्वर दिवटे भाजपा महामंत्री, तनय देशकर जिल्हा सचिव भाजयुमो चंद्रपूर,प्रा.संजय लांबे भाजपा कार्यालय महामंत्री, ब्रह्मपुरी इत्यादी मान्यवरांनी कार्यकारी अभियंता श्री शर्मा यांचे आभार व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here