


वयाच्या दहाव्या वर्षापासून रंगमंचावर पाऊल ठेवत तदनंतर ३५ वर्ष कलानिष्ठा जोपासत सातत्याने रंगदेवतेची आराधना करीत जनसामान्य प्रेक्षकांचे रंजन आणि प्रबोधन करणारे झाडीपट्टी रंगभूमीवर लक्षवेधी अस नाट्यवर्ती, प्रयोगधर्मी सर्जनशील बहुगुणी कलावंत म्हणजेच प्रा. डॉ. शेखर डोंगरे होय. वैशिष्ट्यपूर्ण अभिनय, प्रयोगशील नाट्य दिग्दर्शक, बहुगुणी कलाकार नाट्यकलेला ज्ञानाची, विचाराची आणि परिश्रमाची जोड देऊन तिच्या प्रगतीसाठी धडपडणारा हा सच्चा कलावंत म्हणजे शेखर डोंगरे होय. रंगमंचावर येताच वैविध्यपूर्ण अभिनयाने हास्याची फवारे उडविणारा आणि प्रेक्षकांना स्वतःची व्यक्तीगत दुःख विसरून एका चंदेरी विलक्षण दुनियेत नेणारा अष्टपैलू कलावंत म्हणजेच शेखर डोंगरे या झाडीपट्टीतील जनता ही रसिक, उत्सवप्रिय व नाट्यवेडी आहे.
त्यामुळे मंडई, यात्रा, उरूस, शंकरपट या निमित्ताने गावागावात नाटकाचे आयोजन केले जाते. प्राचीन काळातील भवभूतीपासून नाट्याची दीर्घ परंपरा झाडीपट्टी रंगभूमीला लाभलेली आहे. एकूणच झाडीपट्टी रंगभूमीवर जवळपास ५५ वेगवेगळ्या कंपन्या झाडीवूड वडसा येथे दाखल असून गावोगावीच्या नाटकाच्या प्रयोगातून करोडोची उलाढाल होते.
विनोद हा झाडीपट्टी रंगभूमीचा आत्माच असून अविभाज्य भाग आहे. सामाजिक समस्येचे चित्रण करीत लोक रंजन करणे हे झाडीपट्टी रंगभूमीचे प्रयोजन असल्यामुळेच विनोदाचे स्थान अढळ स्वरूपाचे आहे. झाडीपट्टी रंगभूमीत अनेक विनोदी भूमिका करणारे कलावंत प्रसिद्ध आहेत. डॉ. परशुराम खुणे, के. आत्माराम, अंबादास कामडी, विलास वटी, हिरालाल पेंटर या कलावंताच्या मांदियाळीतील रसिक प्रेक्षकांच्या ओठावरील अग्रक्रमी नाव म्हणजेच मा. शेखर डोंगरे होय. हे सर्व विनोदी कलावंत झाडीपट्टीमध्ये लोकप्रिय आहेत.
पूर्व विदर्भाच्या भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदी काठावरील छोट्याशा मोहरणा गावात शेतकरी कुटुंबात २६ मार्च १९६३ ला जन्मलेल्या वयाच्या दहाव्या वर्षापासून चेहऱ्याला रंग फासून नाटकात प्रथम भूमिका करणाऱ्या या कलावंताने विविध हौशी व व्यावसायिक नाट्यमंडळाच्या माध्यमातून चार हजार पेक्षाही अधिक नाटकातून वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. मोहरणा ता. लाखांदूर ग्रामीण पार्श्वभूमीत जन्मलेल्या शेखर यांना लहुजी डोंगरे – केशव डोंगरे- यांचा प्रेरक वारसा व विविध बाळकडू मिळाल्याने लहानपणापासूनच मन संस्कारी होत गेले. ५ व्यां वर्गात असताना म्हणजे १० वर्षापासूनच अभिनय करण्यास प्रवृत्त झाले. घरातील संस्कार व शिस्त ही प्रवृत्ती त्यांच्या अंगवळणी पडली. खडतर पायवाटेने शैक्षणिक वाटचाल परिश्रमपूर्वक यशस्वीरित्या पूर्ण करून उच्च शिक्षणानंतर प्राध्यापकी पेशा स्वीकारला.
मुळातच असलेली नाट्य क्षेत्रातील आवड व प्रा. रंगारी, बाबुराव कावळे, प्रा. राम दोनाडकर, मधू जोशी यांच्या मार्गदर्शनामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पडत गेले. शालेय- महाविद्यालयीन जीवनाच वैशिष्ट्यपूर्ण अदाकारीने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या या कलावंताने अभिनयाची चुणूक दाखवलेली आहे. ‘चंद्रपूर जिल्ह्याच्या आर्थिक व सामाजिक विकासात सहकारी पतसंस्थांचे योगदान’ या विषयावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे आचार्य पदवी प्राप्त समता ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित सिंदेवाही या पतसंस्थेचे सल्लागार आहेत.
महाविद्यालयीन जीवनात हा स्पर्श मायेचा या नाटकापासून ते ऐतिहासिक नाटके पौराणिक नाटकात झाशीची राणी या नाटकातील फादरची भूमिका, एकच प्याला नाटकातील तळीराम, पाटलाची पोरी जरा जपून नाटकातील गणपा, देव माणूस नाटकातील विलास, भूकंप मधील चंदू, पंख तुटलेले पाखरू मधील प्रकाश या व्यक्तिरेखा स्त्री व्यक्तिरेखा साकारलेल्या आहेत. वेगवेगळ्या नाटकातील वैविध्यपूर्ण अभिनयाच्या भूमिकांच्या छटांनी रसिक मनावर गारुड निर्माण करणारे कलावंत आहेत स्वर्गावर स्वारी, शंखनाद चक्रव्यूह मधील कामातूर लग्नाची बेडी मधील गोकर्ण आणि अवदूत, हार्ट ऑपरेशन या मुक नाट्यत केलेला अभिनय व खाण्याजोगाच. विनोदी कलावंत म्हणून मोहोर उमटवली आहे.
शेखर डोंगरे हार्मोनियम व आर्गन वादक उत्तम गायक आहे, तुझे नयन शराबी गडे ग, ही मातृभूमी आमची अशा गायनाने रसिक मंत्रमुग्ध होऊन जातात. भूमिकेशी एकरूप होत पात्र जिवंत करणारा, भूमिका तन्मयतेने करून प्रेक्षकाना समरसून टाकणारा नटश्रेष्ठ शेखर डोंगरेच. गुणी कलावंत, प्रयोगशील दिग्दर्शक, उत्तम व्यवस्थापक या विषेशामुळे आजही २०२३ या वर्षीच्या झाडीपट्टी रंगभूमीवर सर्वाधिक१२७ प्रयोग संख्या चंद्रकमल थिएटर्स चीच.136 वर्षाच्या झाडीपट्टी रंगभूमीच्या इतिहासात अनेक लहान मोठे प्रेस निर्माण झाल्या आणि विरून गेल्या पण चंद्रकमल थिएटर मात्र व्यावसायिक रंगभूमीवर स्वतःची ठळक प्रतिमा निर्माण करीत अग्रेसरच आहे. वयाच्या दहा वर्षापासून रंगमंचावर पाऊल ठेवत तदनंतर सातत्याने 35 वर्ष कलानिष्ठा जोपासत सातत्याने रंगदेवतेची आराधना करीत जनसामान्य प्रेक्षकांचे रंजन आणि प्रबोधन करणारे झाडीपट्टी रंगभूमीवर लक्षवेधी असा सर्जनशील नाट्यवर्ती, प्रयोगधर्मी आषटपैलु कलावंत म्हणजेच प्रा. डॉ. शेखर डोंगरे होय.
तब्बल ३५ वर्षापासून अर्थात साडेतीन दशके झाडीपट्टी रंगभूमीवर नाट्यकलेची आराधना करीत श्रमजीवी रसिक मायबाप प्रेक्षकांचे मनोरंजन व प्रबोधन करणारा किमयागार म्हणजेच प्रा. डॉ. शेखर डोंगरे होय. डोंगरे यांनी वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाने वैदर्भिय जनमानसाच्या मनावर दीर्घ काळ गारूड निर्माण करणारे रंगभूमीवरील एक अद्भुत नाट्य रसायनच आहे. एखाद्या क्षेत्रात लौकिक मिळणारे अनेक कलावंत आहेत पण अध्यापन, संशोधन, अभिनय, दिग्दर्शन, निर्माता अशा विविध एकापेक्षा अधिक क्षेत्रात श्रेष्ठत्व सिद्ध करून लौकिकास पात्र ठरणारे शेखर डोंगरे सारखे बहुआयामी यशस्वीतेचे मानकरी विरळाच. ते स्वतः तर घडत गेलेच परंतु आपल्या सह कलावंतांना व उदयोन्मुखानाही घडवीत गेले. अनेक नाट्यलेखक, कलावंताना प्रोत्साहित करून मार्ग दाखवित घडविण्यात त्यांचे योगदान महत्वपूर्ण आहे.
शेखर डोंगरे यांनी उच्चारलेली अनेक पालूपदे प्रचंड लोकप्रिय ठरली. मंग नाही त का, घे आता घे, आता केवड्याची हो म्हणतो, घे, आशी हो.. रंगमंचावर शेखर डोंगरे दिसले की, प्रेक्षकच त्या पालूपदाचा उच्चार करीत असतात. नाट्य व चित्रपट या क्षेत्रातील त्यांचे पदार्पण आणि आपल्या अभिनयाने त्यात उमटविलेला अमिट असा ठसा वाखाण्यासारखा आहे. उथळ आचरटपणाच्या झाडीपट्टी रंगभूमीची कोंडी फोडत चौफेर ज्ञान असणाऱ्या कल्पक, गतिमान, परिवर्तनाचा ध्यास अंगीकारलेल्या प्रयोगशील दिग्दर्शकाने ढाचा बडलवित झाडीपट्टी रंगभूमीला वेगळे परिमाण दिले. चतुरस्र अभिनयाने कर्तृत्वाची पताका डौलाने फडकवणारा हा कलावंत रसिकांना आकृष्ट करण्यात सदोदीत यशस्वी ठरला. नाट्यकलेला ज्ञानाची, विचाराची, परिश्रमाची जोड देऊन तिच्या प्रगतीसाठी धडपडणाऱ्या प्रा. डॉ. शेखर डोंगरे या कलावंतांने जवळपास तीन पिढ्यांना मनोरंजनाने आणि प्रबोधनाने अभिरुची संपन्न करण्यातील त्यांचे योगदान सर्वश्रुत आहे.बोलका चेहरा, कसदार आवाज, आकर्षक शरीरयष्टी, भाव व्यक्त करणारे तेजदार डोळे, सादरीकरणाची जाणकारी आणि लकबी यामुळे रंगमंचावर ते आले की सर्वांचे लक्ष वेधून घेत, झाडीपट्टी रंगभूमीवर लक्षवेधी असा सर्जनशील नाट्यवर्ती, प्रयोगधर्मी आषटपैलु कलावंत म्हणजेच प्रा. डॉ. शेखर डोंगरे होय.
सातत्यपूर्णरित्या साडेतीन दशके रंगभूमीवर अभिनय करीत अग्रस्थानी राहणारे ते एकमेव कलावंत आहेत. शेखर डोंगरे हे बालपणापासूनच झाडीपट्टी रंगभूमीवरील वेगवेगळ्या नाटकातून विनोदी भूमिका साकारित आहेत . जवळपास तीन पिढ्यांचे मनोरंजन करून अभिरुची संपन्न करण्यात शेखर डोंगरे यांचे योगदान उल्लेखनीय आहे.त्यांच्या चंद्रकमल नाटय कंपनीच्या प्रयोगांची संख्याही झाडीपट्टीमध्ये सर्वाधिक असते. कल्पकता, गतिमानता, परिवर्तनशीलता आणि प्रयोगशीलता यामुळे नवे आयाम निर्माण करून बांधीलकी जपणारा हा सच्चा कलावंतसं ख्यात्मक आणि गुणात्मक अशा दोन्ही स्तरावर सर्वलक्षी अन् महान ठरला. किंबहुना वैशिष्टयपूर्ण अभिनयाने बहरलेल्या कॉमेडीमुळे जुना प्रेक्षक वर्ग कायम ठेवत नवा प्रेक्षक वर्ग जुळवत झाडीपट्टी रंगभूमीला चैतन्यदायी ठेवण्यात शेखर डोंगरे यांचे योगदान निश्चितच मोलाचे आहे.
कायिक, वाचिक व आहार्य अशा अभिनयाने प्रेक्षकप्रिय अभिनेते ठरलेल्या शेखर डोंगरे यांच्या वेगवेगळ्या भूमिका साकारताना त्यात एकसुरीपणा जाणवत नाही, हे विशेष .अर्थातच एक बहुरूपी ,बहुगुणी असा हा जनप्रिय कलावंत आहे. स्वयंतेजाने झळकणारा हा अनमोल हीरा आहे. सर्जनाची क्षितिजे न्याहाळणा ऱ्या व्यासंगी नटाने चौफेर नजर ठेवत स्वतः व प्रेसला अपडेट ठेवले. नाट्य कलाविषयक निष्ठा सांभाळत मार्गक्रमण करून उत्तम उत्तम नाटके चंद्र कमल च्या माध्यमातून रंगभूमीवर आणली. कलावंताचा झंझावाती प्रवास सर्वश्रूत आहे.
शेखर डोंगरे अभिनेता नाट्य भूमिका प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहिल्या असा हा झाडीपट्टी रंगभूमीच्या अध्यक्षतेतील भरजरी नावलौकिक असलेला कलावंत आहे.त्यांनी गोकर्ण जितक्या तन्मयतेने अभिनेते केला तितक्याच ताकदीने शंकराही उभा केला अर्थातच भिन्न प्रवृत्ती दर्शविणाऱ्या भूमिका एकाच शेखर डोंगरे नावाच्या कलावंताने समर्थपणे उभ्या केल्या खरे तर शेखर डोंगरे यांनी उपजीविकेसाठी प्राध्यापकाची नोकरी पत्करली असली तरी मात्र जीवीकेसाठी नाट्य अभिनय हेच तत्व जीवनभर अंगिकारले दिसते.
झाडीपट्टी रंगभूमी मध्ये आपल्या दमदार अभिनयाचा स्वतंत्र ठसा उंटविणारा प्रचंड लोकप्रियता मिळविणारा हा लक्षवेधी किमयागार विनोदी भूमिकांमुळे त्यांची प्रतिमा जी झळकली ती कायम प्रेक्षकांच्या मनोराज्यात घर करून बसली आहे. अनेक नाटकांच्या प्रयोगाने उच्चांक गाठलेल्या या बहुरंगी, बहुगुणी, बहुरूपी लखलखत्या रंगकर्मी कलावंताच्या कार्यकर्तृत्वाला मनापासून सलाम. त्यांच्याएकूणच नाट्य कर्तुत्वाचा गौरव म्हणून झाडीपट्टी रंगभूमीने त्यांना 20 व 21 ऑक्टोबर २००३ मध्ये अर्जुनी (मोरगाव), जिल्हा गोंदिया येथे संपन्न झालेल्या दुसऱ्या झाडीपट्टी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद वयाच्या ४०व्यां वर्षी बहाल करून सन्मान केला.अशा बहुगुणी, कलासंपन्न, सर्जनशील नाट्यवर्तीवर’ नव्वदोत्तर झाडीपट्टी रंगभूमी :चिंतन आणि चिकित्सा’ हा ग प्राचार्य डॉ. श्याम मोहरकर, डॉ. राजकुमार मुसने, डॉ.जनबंधू मेश्राम, डॉ.धनराज खानोरकर संपादित गौरव ग्रंथ प्रकाशित होतोय. वैशिष्ट्यपूर्ण मुद्राभिनय व देहबोलीने झाडीपट्टी रंगभूमीवर नाममुद्रा कोरणाऱ्या बहुआयामी व कल्पक प्रयोगशील दिग्दर्शकत्वाचे यशस्वी वाटचाल करणाऱ्या रंगमंचीय साधनेचा लेखाजोगा व आढावा घेणारा ऐतिहासिकदृष्ट्या मौलिक ग्रंथ सिद्ध होतोय ही आनंदाची बाब आहे. त्यानिमित्त खूप खूप स्वागत तथा प्रा. डॉ. शेखर डोंगरे यांना दीर्घायुरोग्य लाभो षष्टयब्दीप्रीत्यर्थ अभिष्टचिंतन.
✒️प्रा.राजकुमार मुसणे(आष्टी,जि.गडचिरोली)मो:-9423639532













