


🔹भव्य विदर्भ एकल व समूह नृत्य स्पर्धा
✒️सुयोग सुरेश डांगे(चिमूर,तालुका प्रतिनिधी)
चिमूर(दि.25मार्च):-भवानी डान्स ग्रुप तळोधी (बा) च्या सौजन्याने तळोधी ( बाळापुर) येथे विदर्भ स्तरीय एकल व समुह नृत्य स्पर्धेचे आयोजित केला होता. त्यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्हा अध्यक्ष ओबीसी (ग्रामीण) तथा चिमूर विधानसभा क्षेत्र काॅग्रेसचे युवा नेता दिवाकर निकुरे मार्गदर्शन करतांना म्हणाले की, भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व नागरिकांना राज्यघटनेमध्ये मतदानाचा समान अधिकार दिलेला आहे. त्याचा वापर योग्य करावा असे आवाहन केले. तसेच अशाप्रकारच्या कार्यक़माच्या माध्यमातून तरूणांच्या सुप्त गुणांना मोठ्या प़माणात वाव मिळण्याची संधी उपलब्ध होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार नामदेवराव उसेंडी गड़चिरोली व उपस्थित मान्यवर धनराज मुंगले, खोजराम, माजी जिल्हा परिषद सदस्य मरस्कोल्हे, प्रफुल्ल खापर्डे, माजी सभापती , विनोद बोरकर, रमेश कटारे महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस सहसचिव , संजू अगड़े , जिवन निकेसर, पारस नागरे, विजया वाढ़ई, राहुल करिये, संतोष बोडने, शाम बागडे, लोकेश मेश्राम, अक्षय चौधरी, भूषण कावळे, धनंजय ठलाल, सुरज काश्यप, सुजीत उराडे, निनाद मोहुर्ले, विक्की खेड़कर व उपस्तित सर्व भवानी ग्रुप चे पदाधिकारी तथा सदस्यगण उपस्थित होते.













