


✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)
पुसद(दि.10फेब्रुवारी):- न्यायालयाचे विशेष जिल्हा न्यायाधीश वसंत भास्कर कुलकर्णी हे आपल्या कुटुंबासोबत गनमॅन च्या विशेष सुरक्षेसह आपल्या चारचाकी वाहनाने नागपूर येथून नातेवाईका कडील लग्नसोहळा समारंभ आटपून यवतमाळ मार्गे दिनांक ०७ फेब्रुवारी २०२३ रोजी रात्रीचे दरम्यान पुसदला येत आसता. आर्णी रोडवरील टोल नाक्याजवळ ट्रक क्रमांक एम. एच.३२ पी.जे. ४०२८ क्रमांकाच्या वाहन चालकाने आपले वाहन निष्काळजीपणाने रिव्हर्स घेत न्यायाधीशाच्या एम.एच. ३१ ए.फ.जे. ५२६१ वाहनाला धडक दिली. न्यायाधीश कुलकर्णी यांच्या वाहनाला अचानकपणे जोरदार धडक बसल्याने त्यांचे वाहन शतिग्रस्त झाले असून न्यायधीश कुळकर्णी यांना छातीत फ्रॅक्चर झाल्याचे समजते.
या अपघाताच्या वेळी न्यायाधीश कुलकर्णी यांच्या गनमॅन अंगरक्षक, चालक, मुलगी व पत्नी असे प्रवास करीत होते. या घटनेबाबत न्यायाधीश वसंत कुलकर्णी यांनी दिलेल्या तक्रारीवरून ग्रामीण पोलीस स्टेशन यवतमाळ येथे ट्रक चालक विरुद्ध गुन्हे दाखल करून पुढील कार्यवाहीस सुरूवात केली आहे. . या घटनेची वार्ता पुसद ला कळताच हा अपघात नसून घातपात असावा असा संशय व्यक्त केल्या जात आहे.
न्यायधिश कुलकर्णी यांनी नागपूर आणि पुसद येथे असताना अनेक न्याय निवाड्यात पीडितांवरील अन्याय दूर करण्यासाठी आरोपी विरुद्ध आदेश व निकाल दिले आहेत. त्यामुळेच त्यांना शासनाकडून सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. माञ तरी सुद्धा असे घातपाताच्या घटना घडत असल्याने न्यायालयीन परिसरात न्यायधिष्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने चिंता व्यक्त केल्या जात आहे. या घटनेची सी.आई.डी.मार्फत चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाईची मागणी सुद्धा केल्या जात आहे.













