Home महाराष्ट्र छोटीसी आशा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचा मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात साजरा

छोटीसी आशा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचा मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात साजरा

202

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.17जानेवारी):-नरवणे ता. माण येथे छोटी सी आशा बहुउद्देशिय सामाजिक संस्थे चा मकर संक्रांती व हळदी कुंकवाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करणेत आला यावेळी पंचक्रोशीतील महिलांनी एकत्र येत मकर संक्रातीच्या निमित्त एकमेकींना हळदी कुंकवाचा मान देत मकरसंक्रांती चा सण उत्साहात साजरा केला.

नरवणे गावात प्रथम च छोटी सी आशा बहुउद्देशिय सामाजिक संस्थे मार्फत मकर संक्रांती व हळदी कुंकूवाचा कार्यक्रम घेण्यात आला व नरवणे मधील सर्व महिला वर्गाने उत्साहाने साथ दिली.

या कार्यक्रमात उपस्थित महिलांना हळदी कुंकवाचे पानं व तिळगूळ देण्यात आले.छोटी सी आशा बहुउद्देशिय सामाजिक संस्थे च्या कार्यध्यक्षा सौ. रेश्मा सुर्यकांत कुंभार , सहकारी सौ. कविता एकनाथ बनसोडे व सौ.सरपंच मालन नंदकुमार मासाळ तसेच श्री .सुर्यकांत धर्माजी कुंभार , श्री.सुनील रमेश महामुनी, श्री धनाजी रामहरी जाधव तसेच नरवणे गावातील उपस्थित सर्व महिलां नी मोलाची साथ दिली.शेवटी संस्थेच्या कार्यध्यक्षा सौ. रेश्मा सुर्यकांत कुंभार यांनी सर्वांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here