Home महाराष्ट्र सामूहिक बौद्ध वंदना घेऊन बहुजन नायक कांशीराम यांन अभिवादन

सामूहिक बौद्ध वंदना घेऊन बहुजन नायक कांशीराम यांन अभिवादन

52

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515

गंगाखेड(दि.15मार्च)-अखंड भारतामध्ये फुले,शाहू,आंबेडकर चळवळीची पेरणी करणारे बहुजन नायक कांशीराम यांना 15 मार्च रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर सामूहिक बौद्ध वंदना घेऊन अभिवादन करण्यात आले.

 प्रति रविवारची सामूहिक बौद्ध वंदना होत असताना याप्रसंगी बार्टीचे मुंजाजी कांबळे, बामसेफचे रावसाहेब मस्के, रामभाऊ सावंत,शीलवंत कांबळे, लक्ष्मण कांबळे, सटवाजी ढवळे, लक्ष्मण वावळे,एकनाथ गवळे, वाल्मीक भालेराव, इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती.

 तथागत भगवान बुद्ध,डॉ. बाबासाहेब आंबेडकर मान्यवर कांशीराम यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून सामूहिक बुद्ध वंदना बौद्धाचार्य नवनाथ साळवे यांच्या हस्ते घेण्यात आली. अभिवादन कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रावण गायकवाड, शीलवंत कांबळे यांनी भीम गीतही सादर केले. 

 अभिवादन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंडितराव पारवे, चंद्रगुप्त घनसावंत, बापूराव अवचार,नाना लांडगे, अमोल साळवे,विजय हनवते,राहुल जोंधळे, कपिल हनवते,संविधान साळवे,सम्यक साळवे,रविराज यशोदे,विक्रांत हेंडगे,राधाबाई ढवळे,शकुंतलाबाई भालेराव,मायादेवी होबाळे,पमाबाई दबडे,ताईबाई पैठणे, वंदनाबाई सावंत,नंदनी पारवे,कोमल कांबळे, रोहिणी पारवे,समीक्षा कांबळे,दिव्या अवचार आदींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here