Home महाराष्ट्र श्री नरेंद्र गिरी माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

श्री नरेंद्र गिरी माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

85

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515

पालम तालुक्यातील रावराजूर येथील श्री नरेंद्र गिरी माध्यमिक विद्यालयात (दिनांक २८ फेब्रुवारी शनिवार)रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन तथा डॉ.सी. व्ही.रमण सन्मान दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक पवार एस.एस.होते. प्रमुख पाहुणे म्हणून राठोड एस.के.,अमोल झाडगावकर,काळे ए. के.व चलवाड डी.व्ही.यांची उपस्थिती लाभली होती.कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ.सी.व्ही.रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यानंतर विद्यार्थ्यांनी विज्ञानाविषयी आपली मनोगते व्यक्त केली.विज्ञानाची आवड आणि जिज्ञासा वाढविण्यासाठी प्रकाश डिकळे यांनी विज्ञान प्रश्नमंजुषेचे आयोजन केले.विज्ञान शिक्षक काळे यांनी डॉ.सी.व्ही. रमण यांचे प्रेरणादायी जीवनचरित्र विशद केले तसेच विज्ञानावर आधारित सुंदर कविता सादर केली.

मान्यवरांनी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे महत्त्व स्पष्ट करताना विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याचे आवाहन केले.अंधश्रद्धा आणि अज्ञानाचा अंधार दूर करून विज्ञानाच्या प्रकाशाकडे वाटचाल करण्याचा संदेश देण्यात आला.राठोड यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे ऐतिहासिक महत्त्व पटवून दिले.अध्यक्षीय समारोपात पवार यांनी राष्ट्रध्वजातील तीन रंगांचे वैज्ञानिक महत्त्व उलगडून सांगत विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक विचारांची प्रेरणा जागृत केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रकाश डिकळे यांनी केले.या कार्यक्रमास शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here