Home महाराष्ट्र धुळदेव येथे रस्त्याची कामे अपूर्णच; सातारा पंढरपूर महामार्गाचे काम नऊ वर्षे रेंगळल्याने...

धुळदेव येथे रस्त्याची कामे अपूर्णच; सातारा पंढरपूर महामार्गाचे काम नऊ वर्षे रेंगळल्याने नागरिक त्रस्त

109

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

▪️स्थानिक लोकप्रतिनिधीनी लक्ष घालण्याची होतेय मागणी

 म्हसवड(सातारा)(दि.27फेब्रुवारी):-सातारा ते पंढरपूर या दरम्यान महामार्गावरील अनेक ठिकाणी अर्धवट पूल आणि रस्त्याची कामे मागील नऊ वर्षांपासून प्रलंबित आहेत.या प्रलंबित कामाचाच एक भाग म्हणून धुळदेव ता. माण येथील रस्त्याचे अपूर्ण कामं आहेत यामुळे या ठीकाणी अनेक अपघात होऊन जीव गेले आहेत. याबाबतीत प्रशासनास जाग कधी येणार नागरिक प्रश्न विचारत आहेत 

सातारा ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH 548E या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू होऊन नऊ वर्षे उलटूनही पूर्ण झालेले नाही. सातारा ते पंढरपूर या 143 किमी अंतरात अनेक ठिकाणी ठिकाणी रस्त्याचे काम अपूर्ण आहे. हे काम कधी पुर्ण होणार नागरीकांचा सवाल आहेत 

सातारा पंढरपूर राज्यमार्ग हा महामार्ग विभागाकडे हस्तांतरित झाल्यानंतर रस्त्याची दशा बदलेल अशी अपेक्षा होती. मात्र गेल्या नऊ वर्षांत रखडलेल्या कामांमु‌ळे अपघात वाढले आहेत. राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्यानंतर दळणवळणाची सुविधा वाढेल, अशी अपेक्षा होती. याच महामार्गवर नऊ वर्षे होऊनही मात्र अद्यापही काही ठिकाणी पूल आणि रस्त्याचे काम खोळंबले आहे. त्यामुळे यांचं महामार्गवर पुसेगाव येथील तीर्थ क्षेत्र सेवागिरी महाराजाचे मंदिर, गोंदवले येथील तीर्थ क्षेत्र ब्रह्म चैतन्य महाराजाचे मंदिर, म्हसवड येथील तीर्थ क्षेत्र सिद्धनाथ जोगेशवरी मंदिर, तीर्थ क्षेत्र पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येत असून लाखो भाविक या रस्त्यानी ये जा करतात.पर्यटन, दळणवळणासाठी महत्त्वाच्या असलेल्या सातारा पंढरपूर रस्त्याने जाणाऱ्या वाहनधारकांची आणि भाविक भक्तांची गैरसोय कायम आहे.

या महामार्गाचे काम नऊ ते दहा वर्षांपासून सुरू आहे. अनेकदा रस्ता खोदून ठेवला व काम बंद होते तर अनेक ठिकाणी आजही काम अपूर्णावस्थेत आहे. त्यामुळे वाहनांचे अपघात होतात. यात अनेकांना मरण आले तर अनेकांना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे.या महामार्गच्या पूर्ण होण्याकडे स्थानिक लोकप्रतिनिधीनी लक्ष घालने गरजेचे आहेत असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. प्रशासनाने जनतेच्या उदरेक्काची वाट पाहू नये.

*या महामार्गावरून अनेकदा कामासाठी ये-जा करावी लागते. गेल्या नऊ ते दहा वर्षांपासून या रस्त्याचे काम अनेक ठिकाणी रखडलेले आहे. या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे.*

*बापूसाहेब कोळेकर, स्थानिक नागरिक धुळदेव*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here