Home महाराष्ट्र सिकलसेल आरोग्य शिबीर म्हणजेच रुग्णांची नि:स्वार्थ सेवा

सिकलसेल आरोग्य शिबीर म्हणजेच रुग्णांची नि:स्वार्थ सेवा

118

✒️कुरखेडा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कुरखेडा(दि.25फेब्रुवारी):-मानव सेवा हीच खरी ईश्वरसेवा हे विचार अंगिकारून कुरखेडा येतील आरोग्यधाम संस्थेचे अध्यक्ष डॉ. रमेश कटरे यांनी दोन हजार पाच ला सामाजिक संस्था स्थापन केली आणि या संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यात असलेली सिकलसेलची गाथा व मानवी जीवनावर होणारे परिणाम, आर्थिक, सामाजिक, समाज कसा जगतो, आदिवासी, गोर,गरीब,मागासवर्गीयात सिकलसेचे रुग्ण आजारी जीवन कसे जगतात त्यांची समाजात दयनीय अवस्था बघायला मिळत असते. हीच त्यांची अवस्था बघून डॉ.रमेश कटरे रुग्णासाठी पुढाकार घेऊन मोफत शिबीराचे आयोजन करतात, आणि त्याच शिबीरात त्यांना मोफत औषध, उपचार देतात, हे एक सामाजिक कार्य नसून पुण्याचे कार्य करत आहेत.

नेहमीच प्रमाणे दि.२४ तारखेला गुरुदेव सेवा मंडळ कुरखेडा येथे त्यांनी सिकलसेल आरोग्य शिबीराचे आयोजन केले होते.या कार्यक्रमाचे उद्घाटक व मार्गदर्शक म्हणून डॉ.शैलेश बांबोर्डे हिमेटोलोजीस्ट तज्ञ मुंबई ,अध्यक्ष डॉ.सचिन कवाडकर, भिषक वैधकिय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा, विशेष अतिथी डॉ.अशोक गहाणे तालुका आरोग्य अधिकारी, सुनील सातपुते अध्यक्ष सिकलसेल सेवाभावी संस्था चंद्रपूर, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्या संगीता ठलाल, भाकरे,पुष्पा कटरे तसेच मंचावर पाहुणे उपस्थित होते.

डॉ. शैलेश बांबोर्डे यांनी सिकलसेल आजारावर मोलाचे मार्गदर्शन केले, सुनील सातपुते तसेच सामाजिक कार्यकर्त्या संगीता ठलाल यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. आरोग्यधाम संस्थेच्या वतीने संगीता ठलाल यांचे साहित्यिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी सिकलसेलचे रुग्ण व आरोग्यधाम संस्थेचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.प्रास्ताविक, आयोजन डॉ.रमेश कटरे यांनी केले तर सुत्रसंचालन आणि आभार रोहित लाडे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here