Home महाराष्ट्र त्याग मूर्ती माता रमाई यांची 128 वी जयंती उत्साहात सप्पन्न

त्याग मूर्ती माता रमाई यांची 128 वी जयंती उत्साहात सप्पन्न

277

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515

गंगाखेड(दि.24फेब्रुवारी):-येथे दि 22 फेब्रु. रोजी त्याग मूर्ती माता रमाई यांची 128 वी जयंती भारतीय बौद्ध महासभा ता.शाखा गंगाखेडच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक पंडितराव पारवे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली .

 भारतीय बौद्ध महासभा उत्तर विभाग अध्यक्ष इंजि. एम.एम.भरणे, यांनी याप्रसंगी बोलताना म्हणाले, क्रांती सूर्याची सावली, माता रमाई ने आपली चार मुलं आजारी असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मुलांच्या आजारा विषयी कोणतीही माहिती न दिल्यामुळे मुलांचे प्राण गेले. मुलांच्या आजारपणाचा त्रास बाबासाहेबांना होऊ नये,त्यांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये, डॉ.बाबासाहेब आंबेडकर उच्च शिक्षण घेऊन भारतात परत यावे या उदात्त हेतूने प्रचंड त्याग केला हे आपण बहुजन समाजाने विसरता कामा नये. याप्रसंगी असे विचार इंजि.डॉ.एम. एम.भरणे यांनी व्यक्त केले.

 या प्रसंगी धम्म मंच्यावर प्रमुख उपस्थिती म्हणून पोलीस निरीक्षक मा.श्रीकांत डोंगरे, भारतीय बौद्ध महासभा जिल्हा कोषाध्यक्ष डी. ए.गायकवाड,नागसेन हत्तीअंबीरे,प्रसिद्ध अभिनेत्री/ कवयित्री प्रा.रमणीताई सोनवणे, बेबीताई सोनवणे, बार्टीचे जिल्हा समन्वयक मुंजाजी कांबळे यांचीही उपस्थिती होती. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला बार्टीचे जिल्हा समन्वयक मा. मुंजाजी कांबळे यांनी प्रास्ताविक करत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी रमाई यांच्या त्यागावर प्रकाश टाकला असता कांबळे म्हणाले, रमाई आंबेडकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर परदेशात शिकायला असताना भारत देशात रमाईने कुटुंबातील आजार बाबासाहेबांना न सांगता समाजासाठी रमाईने आपले चार मुले मरण पावल्याची घटना बाबासाहेबांना कळू दिली नाही. त्यामुळे रमाईचा त्याग पाहता आजच्या फुले आंबेडकरी कार्यकर्त्यांनी/उपासकांनी बाबासाहेबांचे विचारावर मुद्दामहून आचरणात केली पाहिजे असे मनापासून वाटते.

मनोगता नंतर पुणे येथील प्रसिद्ध अभिनेत्री तथा प्रा.रमणीताई सोनवणे यांच्या *मी रमाई बोलतेय* या एकपात्री नाट्य प्रयोगाला सुरुवात झाल्या नंतर प्रा.रमणी सोनवणे यांनी सुद्धा त्यागमूर्ती माता रमाईच्या त्यागाचा इतिहास नाट्य अभियानातून सांगत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सावली म्हणून रमाईंनी मेणबत्ती सारखं त्यागाचा प्रकाश दिला हे आपणास कदापिही विसरता येत नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकर सूर्यासारखं तेजोमय जीवन देशासाठी समर्पित करत असताना माता रमाई ने जीवनातील दुःख,स्त्रीच्या भावना बाबासाहेबांना कधीही कळू दिले नाहीत. प्रत्येक क्षणाला त्याग व समाजाप्रती जीवन समर्पित केली आहे. हे सर्व विचार नाट्य अभिनयातून प्रा.रमणी ताईंनी व्यक्त केले.

 ” मी रमाई बोलतेय ” नाट्यप्रयोग सुरू होण्यापूर्वी भ.बुध्द व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मंचावरील सर्व पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सामुहिक वंदना घेतल्यानंतर मंचावरील पाहुण्यांचे रमाई जयंती संयोजन समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले. 22 फेब्रुवारी रविवार असतानाही कार्यक्रमासाठी ग्रामीण भागातील बहुसंख्येने उपासिका व उपासक यांची प्रार्थनीय उपस्थिती होती.

रमाई जयंती महोत्सव यशस्वी करण्यासाठी समता सैनिक दलाचे गोरखनाथ कांबळे, दिलीप देवरे,लहुराज केदारे,चंद्रगुप्त घनसावंत, नाना लांडगे, श्रावण गायकवाड, नवनाथ खंदारे, राहुल जोंधळे, प्रवीण रायभोळे, विकास साळवे, रमेश डबडे आदी बौद्ध उपासक उपासिका यांनी परीश्रम घेतले. घोबाळेताईनी सुत्रसंचलन तर रमेश जोंधळे यांनी आभार प्रदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here