


✒️समीर बल्की(तालुका प्रतिनिधी)
चिमुर(दि.23फेब्रुवारी):- महाराष्ट्र शासन, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने चिमूर तालुक्यातील पुयारदंड येथे बेटी बचाव बेटी पढाव अंतर्गत पथनाट्यातून जागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ब्राईटइज फाउंडेशन, भिवापूर कलावंताच्या माध्यमातून आयोजित या कार्यक्रमात लोकांमध्ये मनोरंजनातून प्रबोधन व्हावे याकरिता गावातील चौकामध्ये पथनाट्य सादर करण्यात आले.
पथनाट्य संचाचे प्रमुख विलास चौधरी यांच्या नेतृत्वाखाली गायक सुनिल नन्नावरे, वादक सुरज राजहिरे, कलावंत नागेश नन्नावरे, पायल श्रीरामे, श्रेयश चौधरी, सलोनी चौधरी, मंगेश जीवतोडे यांनी मुलीच्या जन्माचे स्वागत, शिक्षण, स्त्री पुरुष समान अधिकार, हुंडाबंदी विषयावर प्रबोधन करत कार्यक्रम सादर केला.
या जनजागृती कार्यक्रमासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, चंद्रपूर व ब्राईटइज फाउंडेशन, भिवापूर यांनी संयुक्तपणे केले होते.














