Home महाराष्ट्र ‘मनाच्या गाभाऱ्यातून’ काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा संपन्न 

‘मनाच्या गाभाऱ्यातून’ काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा संपन्न 

68

✒️विशेष प्रतिनीधी(जगदीप वनशिव)

नंदुरबार(दि.21फेब्रुवारी):-जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील तोरखेडा येथील कवयित्री पुजा सोनार यांच्या ‘मनाच्या गाभाऱ्यातून’ या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा नुकताच उत्साहात संपन्न झाला

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोहनदास भामरे (साहित्यिक व विचारवंत, शिरपूर) प्रमुख पाहुणे म्हणून किरण प्रकाश (सुप्रसिद्ध कवी, पुणे), शिवाजी पाटील (लेखक, गीतकार तथा अभिनेते), डॉ. तुषार सनसे (रा.काँ. (शा.प.) जिल्हाध्यक्ष, नंदुरबार), प्राचार्य जीवन जगताप, अहिर सुवर्ण समाज अध्यक्ष शहादा, अजय बिरारी (अभिनेते अहिराणी मराठी गझलकार) तोरखेडा सरपंच सौ. मनीषा गरूड आदी मान्यवर उपस्थित होते.

          काव्यसंग्रहाचे प्रकाशन प्राचार्य सौ. सारिका रंधे (शिरपूर) यांच्या शुभहस्ते करण्यात आले मुंबई येथील वारकरी प्रकाशन यांच्या वतीने हा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. गावातील नागरिक, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते. सामाजिक जाणीवा आणि स्त्रीमनातील भावना प्रभावीपणे मांडणाऱ्या कवियत्रीने शब्द पुजा करत काव्यसंग्रहाचे साहित्यप्रेमींनी मनसोक्त स्वागत केले.

      तोरखेडातील हा प्रकाशन सोहळ्यामध्ये धुळे शिरपूर शहरातील सुप्रसिद्ध कवी 

शहादा मधून आलेले बऱ्याच कवीं. सुरत नाशिक पुणे अमळनेर अशा लांब वरून आलेल्या कवी लोकांनी व नातेवाईकांनी नामांकित गझलकार संगीतकार यांनी भरभरून प्रतिसाद दिला कार्यक्रमाची शोभा वाढवली    

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशवंत निकवाडे (शिरपूर) यांनी केले अशाप्रकारे तोरखेडा या गावी काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here