Home चंद्रपूर चोरटी येथे सिख धर्मसंस्थापक गुरु नानक देव जी यांची जयंती उत्साहात साजरी

चोरटी येथे सिख धर्मसंस्थापक गुरु नानक देव जी यांची जयंती उत्साहात साजरी

351

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.10नोव्हेंबर):- चोरटी येथील गुरुद्वारा गुरु नानक दरबार साहेब येथे सिख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव जी यांची जयंती भक्तिभावाने साजरी करण्यात आली. इ.स. 1469 मध्ये सध्याच्या पाकिस्तानातील ननकाना साहिब येथे जन्मलेले गुरु नानक देव जी यांनी धार्मिक यात्रांद्वारे समानता, बंधुता आणि मानवतेचा संदेश संपूर्ण समाजात पोहोचवला.

लंगर परंपरेची सुरूवात करून त्यांनी सर्वांना समान मानण्याचा आदर्श दिला. “नाम जपना—किरत करो—वंड छक्को” ही त्यांची शिकवण आजही समाजासाठी मार्गदर्शक आहे.

कार्यक्रमाच्या निमित्ताने माजी जिल्हा परिषद सदस्य स्मिता पारधी यांचा श्री गुरु नानक साहेब कमेटी तर्फे सत्कार करण्यात आला.

समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राजेश कांबळे, रक्तविर सेना अध्यक्ष निहाल ढोरे, मालडोंगरीचे माजी सरपंच राजेश पारधी सामाजिक कार्यकर्ते अमित माटे उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजक गुरुद्वारा कमेटी, चोरटी गोविंदसिंग भुराणी, जगतसिंग भुराणी, दयासिंग भुराणी, माया सिंग बावरी, तिलकसिंग भुराणी, मंगलसिंग भुराणी, सुर्जीतसिंग भुराणी, समीरसिंग भुराणी, दलजीतसिंग बावरी, गुरुजीतसिंग बावरी, बालजीतसिंग बावरी, गुर्मीतसिंग भुराणी यांनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here