Home चंद्रपूर “वसुंधरा पायी दिंडीत” राजुरा तालुक्यातील तेवीस भक्तांचा समावेश

“वसुंधरा पायी दिंडीत” राजुरा तालुक्यातील तेवीस भक्तांचा समावेश

132

✒️सौ.सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428

▪️१० सप्टेंबर ला राजुरा येथून निघाले २४ ऑक्टोबर ला घरी परतले

▪️११०० किमी चा चाळीस दिवसांचा श्री क्षेत्र नागपूर ते नाणीजधाम असा “वसुंधरा पायी दिंडीचा” प्रवास

राजुरा(दि.२६ ऑक्टोबर):-नाशिक, तेलंगणा , कामारेड्डी , परभणी, वसई , पुणे , पूर्व विदर्भ व गोवा या उप पिठाहून जगद्गगुरू रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांच्या नाणिजधाम पर्यंत “वसुंधरा पायी दिंडी” ग्लोबल वॉर्मिंग वर प्रबोधन करत निघाल्या होत्या. या दिंडीतून दुर्लक्षित असलेल्या ग्लोबल वॉर्मिंग या विषयावर प्रकाश टाकण्यात आला. हजारो लोकांची खाण्यापिण्याची , निवासाची, मलमूत्र विसर्जनाची , अंघोळीची सोय करताना पर्यावरणाला काहीही हानी होणार नाही याची काळजी आयोजकांकडून घेतली होती. दिंडीच्या मागे कचरा होणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी विशेष सेवेकरींचे पथक या दिंडीत सहभागी झाले होते.

सोबत टॉयलेट व्हॅन देखील तैनात होती. तसेच पिण्याचे पाणी , स्वच्छतेसाठी लागणारे पाणी घेऊन दोन स्वतंत्र टँकर देखील दिंडीत सहभागी झालेले होत्या. त्याचबरोबर या दिंडीच्या माध्यमातून दरवर्षी वृक्षारोपण देखील केले जाते हे विशेष. वसुंधरा पायी दिंडीचे हे सलग तिसरे वर्ष आहे. या दिंडीत राजुरा तालुक्यातील तेवीस धामयात्री भक्त गेले होते. उपपीठ पूर्व विदर्भ श्री क्षेत्र नागपूर ते मुख्यपीठ नाणिजधाम रत्नागिरी पर्यंत असा अकराशे किलोमीटर चा पायदळ प्रवास चाळीस दिवसांत पूर्ण केला. या दिंडीत सहभागी असणारे हरिहर सदाशिवराव बाजूजवार हे दिनांक १० सप्टेंबर ला घरून निघाले व २४ ऑक्टोबर ला घरी परतले.

११ सप्टेंबर ला नागपूर येथून ही पायी दिंडी निघाली होती. बाजूजवार परिवार हे जगद्गगुरू रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी महाराज यांचे निस्सिम भक्त आहे. त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात, सत्संगात ते पुढाकार घेऊन सेवा देतात. वसुंधरा पायी दिंडीत सहभागी होऊन ग्लोबल वॉर्मिंगवर झालेल्या प्रबोधनाचे ते प्रत्यक्ष साक्षीदार आहेत. त्यांच्या या अनुभवाचा उपयोग राजुरातील पर्यावरण प्रेमींना होईल अशी अपेक्षा नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले यांनी व्यक्त केली आहे. तसेच राजुरा तालुक्यातील तेवीस धामयात्रींचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here