Home महाराष्ट्र वाचणामुळे जगण्यातील अभिरुची प्रगल्भ होते- डॉ. चंद्रशेखर हनवंते 

वाचणामुळे जगण्यातील अभिरुची प्रगल्भ होते- डॉ. चंद्रशेखर हनवंते 

155

✒️संजय बागडे(नागभीड प्रतिनिधी)मो:-9168986378

नागभीड(दि.17ऑक्टोबर):-स्थानिक गोविंदराव वारजूकर महाविद्यालय नागभीड येथील ग्रंथालय विभागाच्या वतीने वाचन प्रेरणा दिवस डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या कार्याचा गौरव करून साजरा करण्यात आला. याप्रसंगी ग्रंथालय विभाग प्रमुख डॉ. चंद्रशेखर हनवंते यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून देतांना, वाचनामुळे जीवन जगण्यातील अभिरुची प्रगल्भ होते.

तसेच कल्पनाशक्तीला नवीन आयाम प्राप्त झाल्यामुळे नवीन कलाकृती जन्माला येते. असे विचार त्यांनी व्यक्त केले .या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रा.डॉ गणेश सांगोळकर उपस्थित होते . त्यांनी ही आपल्या मार्गदर्शनातून वाचाल तर वाचाल,अशीच वास्तविकता दर्शविली.

कार्यक्रमाचे संचालन प्रा. मंगेश देवढगले यांनी केले.तर आभार प्रा.डॉ. कापगते यांनी मानले. हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सिंग यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here