Home महाराष्ट्र सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्याच्या निषेधार्थ तीव्र निदर्शने

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्याच्या निषेधार्थ तीव्र निदर्शने

215

▪️आंदोलन तीव्र करण्याचा मुकुंद सपकाळे यांनी दिला इशारा 

✒️जळगाव(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

जळगाव(दि.14ऑक्टोबर):- जळगाव शहरातील संविधान प्रेमी जनतेने भारताचे सरन्यायाधीश यांच्यावर झालेल्या बुटफेक प्रकरणा विरुद्ध आकाशवाणी ते जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव परिसरात महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निदर्शने करण्यात आली बुट फेक करण्याऱ्या ॲड. राकेश तिवारी याच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले .

    मोर्च्याचे नेतृत्व मुकुंद सपकाळे , डॉ. करीम सालार , ॲड. राजेश झाल्टे , जयसिंग वाघ , सुरेंद्र पाटील , सागर सपके आदींनी केले .

     देशद्रोही राकेश तिवारी मुर्दाबाद , ब्राम्हणशाही , मनुवाद मुर्दाबाद , संविधान जिंदाबाद , लोकशाहीचा , बाबासाहेबांचा विजय असो अश्या घोषणा देण्यात आल्या. निदर्शनामुळे वाहतूक काहीवेळा करिता विस्कळीत झाली होती. याप्रसंगी स्त्री , पुरुष यांनी मोठ्याप्रमाणात सहभाग घेऊन ॲड. राकेश तिवारी याला देशद्रोही घोषित करण्यात यावे म्हणून जोरदार नारेबाजी केली .

    जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात निदर्शनानंतर मुकुंद सपकाळे , ॲड. राजेश झाल्टे, डॉ. करीम सालार , सुरेंद्र पाटील , सुरेश चांगरे यांनी मार्गदर्शन केले , मुख्य संयोजक मुकुंद सपकाळे यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर ॲड. राकेश तिवारी याने फेकलेला बुट हा भारतीय लोकशाहीला आव्हान असून , लोकशाहीला , संविधानाला नाकारणारे आहे , यातून देशातील जातीयवाद , धर्मांधता मोठ्याप्रमाणात वाढली असल्याचे दिसून येते .असे सांगून ॲड. राजेश तिवारी वर देशद्रोहाचा खटला न भरल्यास आंदोलन तीव्र केले जाईल असा इशारा दिला .

    निदर्शने आंदोलनात बापूराव पानपाटील , भगवान बाविस्कर , ॲड. विक्की साळवे , ॲड. डी. एस. भालेराव , ॲड. हेमंत दाभाडे , अमजद पठाण , जमील शेख , आशा तडवी , ज्योती भालेराव , कविता सपकाळे , जया सोनवणे , रंजीता तायडे , ॲड. नदीम काझी, डॉ. सुरेश तायडे , प्रा. किसन हिरोळे , प्रा. प्रीतीलाल पवार तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते .

   यशस्वितेकरिता जगदीश सपकाळे , महेंद्र केदार , दत्तू सोनवणे , दिलीप सपकाळे , वाल्मीक जाधव , आनंदा तायडे , डी. एम. भालेराव , चंद्रगुप्त सुरवाडे , साहेबराव बागुल , अजय बिऱ्हाडे , सोमा भालेराव आदींनी परिश्रम घेतले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here