Home महाराष्ट्र घरकुल लाभार्थ्यांना विनामूल्य वाळू देण्याची मागणी – ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखेचे निवेदन

घरकुल लाभार्थ्यांना विनामूल्य वाळू देण्याची मागणी – ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखेचे निवेदन

134

 

गंगाखेड (प्रतिनिधी):
ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा गंगाखेड यांच्यावतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयात निवेदन देऊन घरकुल लाभार्थ्यांना शासन निर्णयानुसार विनामूल्य वाळू उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.

शासन निर्णय क्रमांक गौखनि-10/1222/प्र.क्र.82/ख-1 दि. 19 एप्रिल 2023 नुसार घरकुल लाभार्थ्यांना बांधकामासाठी पाच ब्रास वाळू मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, गंगाखेड तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांना अद्याप वाळू मिळालेली नाही.

निवेदनात म्हटले आहे की, घरकुल योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या लाभार्थ्यांचे बांधकाम हप्त्याने मिळणाऱ्या निधीमुळे वेळेत पूर्ण होत नाही. तसेच अवैध वाळू विक्रीमुळे बाजारात वाळूचे दर प्रचंड वाढले आहेत. परिणामी गरीब लाभार्थ्यांना बांधकाम पूर्ण करणे कठीण झाले आहे. अनेकांच्या संसाराचे हाल होत असून काहींना भाड्याच्या घरात जास्तीचा खर्च करावा लागत आहे.

संघटनेने प्रशासनाकडे मागणी केली की, गंगाखेड तहसील कार्यालयात अर्ज केलेल्या सर्व घरकुल लाभार्थ्यांना तातडीने विनामूल्य वाळू पुरवावी, जेणेकरून त्यांचे घरकुल बांधकाम वेळेत पूर्ण होईल आणि त्यांना हक्काचा निवारा मिळेल.

ही मागणी करण्यासाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे जिल्हा संघटक उत्तम काळे, तालुकाध्यक्ष प्रभू राठोड, तालुका उपाध्यक्ष राजेभाऊ लांडगे, तालुका सचिव संतोष कलिंदर, शहराध्यक्ष अमोल नेजे आणि शहर सचिव राजकुमार मुंडे यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयात निवेदन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here