Home महाराष्ट्र शेतीमाल वडूज कृषी उत्पन्न समितीमध्येआणावा-सभापती दत्तात्रय पवार

शेतीमाल वडूज कृषी उत्पन्न समितीमध्येआणावा-सभापती दत्तात्रय पवार

125

 

खटाव प्रतिनिधी/ नितीन राजे (9822800812)

 

 

 

सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वडूज कृषी उत्पन्न बाजार समितीने भाजीपाला मार्केट दीड महिन्यापूर्वी सुरू केले असून त्याला शेतकरी व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त व प्रतिसाद मिळत आहे. खटाव – माण तालुक्यासह आसपासच्या शेतकऱ्यांनी उच्चांकी दरासाठी वडूज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपला माल आणावा, असे आवाहन सभापती दत्तात्रय पवार यांनी केले आहे.

वडूज येथे छत्रपती शिवाजी महाराज फळे, भाजीपाला मार्केट व व्यापारी संकुलामुळे शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ मिळाली आहे. यामध्ये सर्व प्रकारचा भाजीपाला, कांदा, बटाटाच्या मोठ्या प्रमाणावर लिलाव पद्धतीने चांगल्या भावाने शेतीमाल विकला जात आहे. तसेच त्याचे रोख रक्कम (पेमेंट) जाग्यावरच दिले जात आहे. दररोज सकाळी सहा आहे. बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी चहा, नाष्टाच्या हॉटेलसह टॉयलेट बाथरूमची सोय केली आहे. आठवड्यातून फक्त शुक्रवारी एक दिवस मार्केट बंद राहणार आहे याची दखल घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल विक्रीस आणावा.

शेतकऱ्यांच्या सेवेसाठी सभापती दत्तात्रय पवार, उपसभापती विजयकुमार शिंदे, सर्व संचालक, सचिव दत्तात्रय नलवडे व कर्मचारी कायमस्वरूपी तत्पर आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here