


*सचिन सरतापे( प्रतिनिधी म्हसवड) मोबा. 9075686100*
म्हसवड (सातारा ) : गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी इ-के.वाय.सी करणे अनिवार्य आहे.ज्यांनी अद्याप इ-के.वाय.सी केलेले नाही, त्यांनी तातडीने करून घ्यावे. अन्यथा सिलेंडर मिळण्यात अडचण येऊ शकते असे आवाहन शुभम भारत गॅस एजन्सी, म्हसवड यांचे वतीने ग्राहकांना करणेत आले आहे.
माण तालुका व परिसरातील भारत गॅस ग्राहकांची गैरसोय होऊ नये यासाठी एजन्सीची अधिकृत वाहनाद्वारे इ-के.वाय.सी. करण्याची सोय करण्यात आलेली आहे. त्यामुळे ग्राहकांना थेट मुख्य कार्यालय, म्हसवड येथे येणे बंधनकारक राहणार नाही यांचा लाभ ग्राहकांनी घ्यावा.
इ-के.वाय.सी साठी करणेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड,गॅस पुस्तक आणि स्वतः व्यक्ती उपस्थित असणे आवश्यक आहे
तरी लवकरात लवकर सर्व ग्राहकांनी तातडीने सहकार्य करून इ-के.वाय.सी पूर्ण करावी, असे आवाहन शुभम भारत गॅस एजन्सी, म्हसवड तर्फे करण्यात आले आहे.














