Home महाराष्ट्र टाटा पॉवरविरोधातील संघर्ष टोकाला; दंडवत आंदोलनाने पेटला माणच्या भूमिपुत्रांचा लढा

टाटा पॉवरविरोधातील संघर्ष टोकाला; दंडवत आंदोलनाने पेटला माणच्या भूमिपुत्रांचा लढा

168

*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा. 9075686100*

 

म्हसवड (सातारा) : – माणच्या भूमिपुत्रांचा संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे! साताऱ्यातील माण तालुक्यातील पळसावडे येथील टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी कंपनीविरोधात आंदोलन अधिक भडकले आहे. सामाजिक कार्यकर्ते महेश करचे यांच्या नेतृत्वाखाली आज कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर दंडवत घालत मोर्चा काढला आणि आपले गाऱ्हाणे निवेदनाद्वारे अधिकाऱ्यांसमोर ठेवले.

गेल्या तीन दिवसांपासून हे आंदोलक आमरण उपोषणाला बसले आहेत… पण प्रशासनाने अद्यापही दखल घेतली नाही. अन्याय सहन न करणाऱ्या या भूमिपुत्रांनी अखेर दंडवत आंदोलन करून रोष प्रकट केला.

न्याय, कायमस्वरूपी रोजगार, पगारवाढ आणि आरोग्यसुविधा – या प्रमुख मागण्यांना प्रतिसाद मिळाला नाही, तर संघर्ष आणखी तीव्र करण्याचा इशारा करचे यांनी दिला आहे.

टाटा पॉवरविरोधातील हा लढा आता निर्णायक वळणावर… आणि भूमिपुत्रांचा आवाज प्रशासनाने दुर्लक्षित केल्यास पुढील दिवसांत संघर्षाचे रणांगण आणखी पेटण्याची चिन्हं दिसत आहेत.

यावेळी महेश करचे म्हणाले कि, “कामगारांचा घाम शोषून टाटा पॉवर करोडोंची कमाई करते, पण भूमिपुत्रांना न्याय द्यायचा मात्र टाळाटाळ करते. आम्ही झुकणार नाही, आता हा लढा अंतिम विजय मिळवूनच थांबणार!”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here