


सावनेर ११ ऑगस्ट
श्रीकृष्ण अध्यापक विद्यालय सावनेर चा परीक्षा परिषद, पुणे तर्फे घेण्यात आलेल्या डी.एल.एड. परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात द्वितीय वर्षामध्ये प्रतीक्षा बळवंत बोबडे हिने 84.50 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला, पायल जयराम भिवगडे हिने 84.50 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला, लखन वसंत जांभूळकर यांनी 83.50 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला,
तर प्रथम वर्षात कु. राजश्री संतोष वानखडे हिने 88.70 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला, प्रज्ञा रोशन भालेराव हिने 84.50 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला, पवराज बळीराम कडक याने 84.20 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. प्रथम वर्षातील 50 विद्यार्थ्यांपैकी 19 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर द्वितीय वर्षात 42 विद्यार्थ्यांपैकी 21 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून गुणवंत छात्रध्यापकाचे संस्थेचे अध्यक्ष विनोदराव उलमाले, सचिव बाबाराव उलमाले, प्राचार्य विजय गणोरकर , प्रा. नीता कुंभारकर, प्रा. हेमलता चोपडे, प्रा. दर्शना राऊत, प्रा. अश्विनी ताजने, प्रा. राहुल गहुकर, प्रा. मुरलीधर ढगे , प्रा. आसटकर मॅडम, विनोद जुनघरे, प्रभाकर महाजन, दिलीप घुगल यांनी अभिनंदन केले.













