Home महाराष्ट्र फुले एज्युकेशन तर्फे पंढरपूर परिसरात उद्या होणार सत्यशोधक 15 वा.वास्तू सोहळा.

फुले एज्युकेशन तर्फे पंढरपूर परिसरात उद्या होणार सत्यशोधक 15 वा.वास्तू सोहळा.

846

*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड )मोबा. 9075686100*

म्हसवड (सातारा ) : – फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाऊंडेशन च्या बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे भैरवनाथ वाडी,पंढरपूर येथील श्रीमती द्वारकाबाई कुंडलिक देवकते यांच्या द्वारका निवास बंगल्याची महात्मा फुले यांना अभिप्रेत असलेल्या पद्धतीने सत्यशोधक गृहप्रवेश व वास्तू पूजन सोहळा उद्या रविवार दि.3 ऑगस्ट 25 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित केलेला आहे. ह्या सोहळ्याचे विधीकार्य या संस्थेचे अध्यक्ष व महात्मा फुले साहित्य साधने चरित्र व प्रकाशन समिती, महाराष्ट्र शासनाचे सदस्य सत्यशोधक रघुनाथ ढोक सिद्धीस नेणार आहेत.
या कार्यक्रमाच्या आयोजिका श्रीमती.द्वारकाबाई देवकते म्हणाल्या की सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली त्यास पुढील महिन्यात 152 वर्ष पूर्ण होतील तरीदेखील समाजामध्ये अंधश्रद्धा ,कर्मकांड मुहूर्त या गोष्टीला मोठे खत पाणी मिळत असून या मध्ये नाहक बहुजन समाजाचे मोठे आर्थिक नुकसान व फसवणूक होत आहे. या आधुनिक काळात या गोष्टील मूठमाती देणे साठी सर्वांनी थोर संत ,महापुरुष यांच्या कृतिशील विचाराने व कार्याने पुढे जाणे ही काळाची गरज आहे. नुसते शिक्षण घेऊन उपयोग नाही तर खरे खोटे यामधील सत्यता पडताळणी गरजेचे आहे म्हणूनच मी कोण काय म्हणेल यापेक्षा सत्यशोधक वास्तू पूजन सोहळा किती आदर्श सोहळा आहे याची प्रचिती देण्यासाठी कोणताही मुहूर्त न पहाता सुट्टीचा दिवस निवडला आहे तरी आपण या सोहळ्यात सहभागी व्हावे असे देखील त्यांनी आव्हान केले आहे.
सत्यशोधक ढोक यांनी माहिती दिली की या पंढरपूर परिसरात प्रथमच आमचे संस्थेतर्फे वास्तू पूजन सोहळा आयोजित होत असून गेल्या 5 वर्षातील हा 15 वा सोहळा असून संस्थे तर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीनिमिताने दि.6 ऑगस्ट 25 रोजी पुणे येथील केंद्रात आई वडील यांच्या संमतीने हैदराबाद चा लक्ष्मण पांचाळ आणि बार्शी ची तेजश्री शेंडगे यांचा 54 वा आंतरजातीय सत्यशोधक विवाह सोहळा आयोजित केला आहे.संस्थेचे कार्य पूर्ण महाराष्ट्र व इतर राज्यात पूर्णपणे मोफत चालत आहे असे देखील सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here