Home शैक्षणिक कु. भाग्यश्री सगट हिचे वक्तृत्व स्पर्धेत यश

कु. भाग्यश्री सगट हिचे वक्तृत्व स्पर्धेत यश

182

अंबाजोगाई (प्रतिनिधी) : तालुक्यातील देवळा येथील विश्वरुपी माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी कु. भाग्यश्री सगट हिने वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालय, वरवटी येथे संपन्न झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. दि. २९ जुलै रोजी पार पडलेल्या या वक्तृत्व स्पर्धेत ‘भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एका क्रांतिकारकाचे योगदान’ या विषयावर तिने अत्यंत प्रभावीपणे आपले विचार व्यक्त करून उपस्थितांची व परीक्षकांची मने जिंकली.
रूपये तीन हजार पारितोषिक देवून आयोजकांच्या वतीने तिला सन्मानित करण्यात आले. यासाठी तिला शाळेतील शिक्षक हनुमंत आपेट यांनी मार्गदर्शन केले. तिच्या या यशाबद्दल संस्थेचे सचिव राजेंद्र लोमटे, उपाध्यक्ष सतीश लोमटे, शाळेचे मुख्याध्यापक खोसे एस. जे, शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here