


ब्रम्हपुरी:- नुकत्याच पार पडलेल्या बिट्स पिलानी वास्को गोवा येथे दीक्षांत समारंभात आरमोरी येथील सौरभ रामदास मदनकर यांना आचार्य पदवी ने कुमारमंगलम बिर्ला यांच्या हस्ते सम्मानित करण्यात आले.
त्याचा गणित हा विषय होता. गणित विषयात आचार्य पदवी प्राप्त करून मानाचा तुरा उंचावला. वडील हे मुळचे अऱ्हेरनवरगाव येथील असून ते उपमुख्याध्यापक पदावरूंन सेवानिवृत्त झाले. आई गृहीनी आहेत. बहीण गोल्डमेड्यालीस्ट असून भाऊ कॉम्प्युटर इंजिनिअर आहे. सौरभ यांचे माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालय आरमोरी, उच्च माध्यमिक शिक्षण हडस हायस्कूल नागपूर, तर बी. एससी. फर्ग्युसन महाविद्यालय पुणे आणि एम. एससी. हैदराबाद विद्यापीठातून झाले. जिद्द, चिकाटी आणि मेहनतीने त्यांनी यश संपादन केले. यशाचे श्रेय त्यांनी कुटुंब आणि गुरुजन यांना दिले.













