


प्रतिनिधी (अनिल साळवे, 8698566515)
संत शिरोमणी सावता माळी यांची पुण्यतिथी गंगाखेड येथे उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने ह. भ. प. दिलीप महाराज जोशी ईसादकर यांचे किर्तन संपन्न झाले.
शहरातील खडकपूरा भागात असलेल्या सावता माळी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महिला मंडळाच्या वतीने महिनाभर सावता माळी यांचे चरित्र वाचन करण्यात आले. या ग्रंथाचा समारोपही आज करण्यात आला. ह. भ. प. ईसादकर यांनी सावता माळी यांच्या जिवन चरित्रावर प्रकाश टाकणारे किर्तन केले. दुपारी किर्तनानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माळी समाजातील युवा कार्यकर्ते व महिला मंडळाने परिश्रम घेतले.














