Home महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दहिवडी आणि म्हसवड येथे भव्य रक्तदान शिबिर...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दहिवडी आणि म्हसवड येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न

145

*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड )मोबा. 9075686100*

 

म्हसवड (सातारा ) : भारतीय जनता पार्टी माण तालुक्याच्या वतीने आज दहिवडी व म्हसवड शहरात राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामविकास व पंचायतराज मंत्री ना.मा.श्री.जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या भव्य रक्तदान शिबिरांचे उद्घाटन ना.जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते हस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. समाजातील गरजूंना नवजीवन देणाऱ्या या उपक्रमात अनेक रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. मुख्यमंत्री साहेबांनी गोरगरिबांच्या सेवेसाठी केलेली कृतिशील बांधिलकी आणि त्यांचा लोककल्याणाचा दृष्टिकोन याला समर्पित भावनेतून हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (भाऊ) यांनी रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना प्रमाणपत्राचे वितरण करून या शिबिरात माण तालुक्यातील सर्व गावांमधून तसेच म्हसवड व दहिवडी शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत सामाजिक बांधिलकी जपली त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करून या शिबिराच्या आयोजनासाठी आणि रक्तसंकलनासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आणि पत्रकार बांधव, डॉक्टर,आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here