Home गडचिरोली गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा व समाज प्रबोधन कार्यक्रम संपन्न

गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा व समाज प्रबोधन कार्यक्रम संपन्न

197

 

गडचिरोली: समता संघर्ष समाज परिवर्तन संघटना, महाराष्ट्र राज्य शाखा गडचिरोली यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व समाज प्रबोधन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम प्रबुद्ध बौद्ध विहार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, आय.टी.आय. जवळ, गडचिरोली येथे आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमात इयत्ता १०वी व १२वी मध्ये उत्तम यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांचे कौतुक करण्यात आले. त्यांना प्रमाणपत्रे, सन्मानचिन्हे व संविधान ग्रंथ भेट देण्यात आले. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या यशामागील प्रेरणा व स्वप्ने याविषयी मनोगत व्यक्त केले.

सत्कार समारंभानंतर समाज प्रबोधन सत्र घेण्यात आले, ज्यामध्ये वक्त्यांनी शिक्षण, समता, सामाजिक न्याय व संविधानाचे मूल्यमापन यावर विचार मांडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा उजाळा देत उपस्थितांना प्रेरणादायी संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मान. किरण मडावी सर सह उद्घाटक शेखर पुल्लिवार, अध्यक्ष मायताई मोहूर्ले, तसेच दिगंबर लाटेलवार, राजेश कलगट्टीवार, दादाजी बोलीवार, भास्कर मेश्राम, लक्ष्मण मोहूर्ले, प्राध्यापक आलेवार सर, दौलत पोवरे व इतर मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन समता संघर्ष समाज परिवर्तन संघटना, महाराष्ट्र राज्य शाखा गडचिरोली यांच्या वतीने करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय देवतळे, सूत्र संचालन संदीप येनगंटीवार, आभार किशोर नारुले यांंनी व्यक्त केले,
कार्यक्रमात परमेश्वर मोहूर्ले, विजय गंगासागर, अनिल तोटपल्लिवर, संजय गोरडवर, देवानंद कस्तावर, सुषमा कारेवार, पुरूषोत्तम लातेलवर, मोहनदास इटकल वार, समाज बांधव, भगिनी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने सहभाग दर्शविला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here