Home महाराष्ट्र निर्मल उडिद बियाण्याची करमाळ्यात टंचाई बियाण्याची छापील किमतीपेक्षा जास्त भावाने विक्री सुरू

निर्मल उडिद बियाण्याची करमाळ्यात टंचाई बियाण्याची छापील किमतीपेक्षा जास्त भावाने विक्री सुरू

253

दि.8
नागेश खुपसे-पाटील
(सोलापूर जिल्हा प्रतिनिधी)
करमाळा तालुक्यात मॉनसून पुर्व पावसामुळे एकीकडे केळी फळबागांचे नुकसान झाले असले तरी दुसरीकडे कोरडावाहू शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे ,सध्या वापसा झाल्याने पेरणी योग्य वातावरण झाले आहे, दरवर्षी पंधरा ते वीस जुन च्या दरम्यान पेरणी योग्य पाऊस व वापसा होत असतो . या वर्षी लवकर झालेल्या पवासामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामात दोन पिके काढण्याची लगबग सुरू झाल्याने तुरी ऐवजी नगदी पिक म्हणून ओळख असलेल्या उडीदावर शेतकऱ्यांकडून उड्या मारल्या जात आहेत. तिन महिन्यांत उडीद पिक निघाल्यानंतर ज्वारी चे पिक देखील घेता येणार असल्याने उडीद ला पंसदी दिली जात आहे.

उडीद खरेदी करताना निर्मल कंपनीच्या उडीदाचिच मागणी होत असल्याने इतर उडिदाचे बियाणे वितरकांकडे पडून असल्याचे चित्र दिसत आहे. उडीद खरेदी साठी शेजारील, कर्जत, जामखेड तालुक्यातील शेतकरी देखील करमाळ्यात उडीद खरेदीसाठी येताना दिसत असल्याने अधिकृत कृषी केंद्रां समोर रांगा लागल्या आहेत.
*बियाणाची चढ्या दराने विक्री*

निर्मल उडिदाची मागणी वाढल्याने टंचाई निर्माण झाली आहे याचा गैरफायदा काही कृषी विक्रेत्यांकडून घेतला जात आहे व किमतीपेक्षा जास्त दराने विक्री केली जात असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे .
*किमतींपेक्षा जास्त पैसे मागीतल्यास तक्रार करा*

दोन दिवसांत मुबलक उडीद बियाणे उपलब्ध होणार आहे शेतकऱ्यांनी उडीद बियाणे खरेदीसाठी अधिकचे पैसे देऊ नयेत खरेदी करताना पावती घ्यावी जास्त पैसे मागीतल्यास तात्काळ कृषी कार्यालयाशी संपर्क साधा तात्काळ कारवाई करू असे आव्हान
देवराव चव्हाण
तालुका कृषी अधिकारी करमाळा यांनी शेतकऱ्याला केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here